मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Mयांनी काल संध्याकाळी एक ट्विट करत राज्यात खळबळ उडवून दिली. यात त्यांनी दोन व्यक्तींचा फोटो ट्विट करत गेल्या काही दिवसांपासून काही लोक माझ्या घराची आणि शाळेची रेकी करत असल्याचा आरोप मलिक यांनी केला. त्यानंतर आज त्यांनी या मुद्दयावर पत्रकार परिषद घेत केंद्रीय यंत्रणांचा आपल्याला खोट्या केसेमध्ये अडकवण्याचा प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप केला आहे. तसेच "माझ्या घरी या मी सगळी माहिती देतो" असे म्हणत मलिकांनी त्यांना आव्हानही दिले.
नवाब मलिक आज म्हणाले, मी काल दोन लोकांचे फोटो कॅमेरा आणि गाडीसोबत टाकले आहेत. आर्यन खानचे प्रकरण सुरु झाले तेव्हापासून माझ्यावर कोणतरी पाळत ठेवत असल्याची माहिती मिळत होती. इतकंच नाही तर मी कुठे जातो, माझ्या कुटुंबातील कोण व्यक्ती कधी, कुठे जातो, काय करतो? याची सगळी माहिती घेतली जात होती. कालही अशीच घटना घडली, तेव्हा पाठलाग करुन त्या दोन व्यक्तींना पकडण्यात आले. तेव्हा त्यांनी आपण घाबरुन पळत जात असल्याच म्हटल होत. पण एवढा सगळा खटाटोप करण्यापेक्षा माझ्याकडे या मी सगळी माहिती देतो, असेही मलिक म्हणाले.
तसेच हा पाठलाग म्हणजे आपल्याला खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवून आपली अवस्था अनिल देशमुख यांच्यासारखी करण्याचा केंद्रीय यंत्रणांचा प्रयत्न असल्याचा आरोपही मलिक यांनी केला. मात्र या डावाला आपण घाबरत नाही. या केंद्रीय यंत्रणांमधील अधिकाऱ्यांचे व्हॉट्सअॅप चॅट मिळाले आहेत. या चॅटच्या आधारे आपण मुंबई सीपी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे तक्रार करणार आहे. राज्याच्या एका मंत्र्याला खोट्या आरोपांमध्ये फसवण्याचा प्रयत्न असेल तर ते खपवून घेतल जाणार नाही. असेही मलिक म्हणाले. तसेच या अधिकांऱ्यांचा कुठेतरी भाजपच्या लोकांशीही संबंध आहे, असा आरोपही मलिक यांनी केला.
नवाब मलिक यांनी काय ट्विट केले होते?
नवाब मलिक यांनी दोन व्यक्तींचे फोटो ट्विट करत या गाडीतील हे लोक गेल्या काही दिवसांपासून माझे घर आणि शाळेची रेकी करत आहेत. कोणी यांना ओळखत असेल तर मला माहिती द्या. या फोटोतील लोकांना मी सांगू इच्छितो की तुम्हाला माझी काही माहिती हवी असेल तर मला येऊन भेटा. मी सर्व माहिती देतो, असेही त्यांनी म्हटले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.