Jayant Patil On Dharmendra Pradhan : जयंत पाटलांचा उपरोधात्मक टोला; 'मोदी सत्तेत येताच घडू लागल्या 'क्रांतिकारी' गोष्टी'

Jayant Patil tweet on the governance of the Union Ministry of Education : युजीसी नेट परीक्षा रद्द करण्याची घोषणा, त्यापूर्वी यूजी-नीट 2024 परीक्षेतील पेपरफुटीवरून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या कारभारावर टीका केली. अनेक 'क्रांतिकारी' गोष्टी घडत आहेत, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला.
Jayant Patil
Jayant PatilSarkarnama

Jayant Patil On NEET-NET exam : युजीसी नेट परीक्षा रद्द करण्याची घोषणा, त्यापूर्वी यूजी-नीट 2024 परीक्षेतील पेपरफुटीमुळे मोदी 3.0 सरकारच्या केंद्रीय शिक्षण मंत्रालयाला विरोधकांनी घेरले आहे.

जयंत पाटील यांनी नरेंद्र मोदी सत्तेत येताच 'क्रांतिकारी' गोष्टी घडत असल्याचा उपरोधात्मक टोला लगावला. देशाचे भविष्य हे देशाच्या वर्गखोल्यांमध्ये आकार घेत असल्याचे कायम बोलले जाते. मात्र याच देशाच्या भविष्यासोबत केंद्र सरकार अक्षरशः खेळत असल्याचा गंभीर टिप्पणी जयंत पाटील यांनी केली.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या कारभारावर टीका करणारी ट्विटरवर पोस्ट शेअर केली. "देशभरात नीट परीक्षांवरून जबरदस्त गोंधळ सुरू आहे. या प्रकरणात रोज नवनवीन गोष्टी घडत आहेत. नरेंद्र मोदीजी (Narendra Modi) यांनी सत्तेत आल्यावर पहिल्या शंभर दिवसांत अनेक क्रांतिकारी निर्णय घेणार असल्याचे सांगितले जात होते. त्याचप्रमाणे अनेक 'क्रांतिकारी' गोष्टी घडत आहेत", असे जयंत पाटील यांनी म्हटले.

पहिल्या दहा दिवसांतच यूजीसी नेट परीक्षा रद्द झाली. नीट परीक्षा पेपर फुटल्याने रद्द झाली आणि आता नीटची पदव्युत्तर परीक्षा देखील पुढे ढकलण्यात आली. 'देशाचे भविष्य हे देशाच्या वर्गखोल्यांमध्ये आकार घेत आहे', असे बोलले जाते. मात्र याच देशाच्या भविष्यासोबत केंद्र सरकार अक्षरशः खेळत आहे. अवघ्या 12 तास आधी परीक्षा रद्द करणे नक्की कशाचे द्योतक आहे ? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील यांनी केला.

जयंत पाटील यांनी परीक्षांबाबत अधिक स्वायत्तेची मागणी केली. प्रवेश परीक्षा राज्य पातळीवर घेण्यात येऊन राज्यांना याबाबतीत अधिक स्वायत्तता दिली जावी. मात्र केंद्र सरकारला सर्व काही स्वतःच्या हातात ठेवायचे आहेत. यातून अनेक अडचणी उद्भवतात. या अनागोंदीमुळे उद्विग्न येते. उद्या काही युवकांनी टोकाचे निर्णय घेतल्यास, त्याची जबाबदारी केंद्र सरकारची असेल असा इशाराही जयंत पाटील यांनी दिला.

परीक्षा सुधारणांसाठी समिती

दरम्यान, केंद्रीय शिक्षण विभागाने स्पर्धा परीक्षांमध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने उच्चस्तरीय सात सदस्यीय समितीची घोषणा केली. इस्त्रोचे माजी प्रमुख के. राधाकृष्णन या समितीचे अध्यक्ष असतील. पारदर्शक, सुरळीत आणि निष्पक्ष परीक्षा घेण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलल्याने केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद प्रधान यांनी सांगितले. पादर्शक, छेडछाडमुक्त आणि शून्य त्रुटी परीक्षा घेण्यास आम्ही कटिबद्ध आहोत, असेही धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com