..तर सोबत राहू ! जितेंद्र आव्हाडांच्या विधानावरुन महाविकास आघाडीत बिघाडी?

ठाणे महापालिका निवडणुकीत संदर्भात आव्हाडांनी (TMC election) हे विधान केल्यानं चर्चांना उधाण झाले आहे.
jitendra awhad
jitendra awhad sarkarnama
Published on
Updated on

मुंबई : राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड आणि शिवसेना यांच्यातील मतभेद जगजाहीर आहेत. कळव्यातील खारेगाव उड्डाणपुलाचा लोकार्पण कार्यक्रमात शिवेसना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याचं ते स्पष्टपणे दिसून आले होते. असेच एक नवं विधान आव्हाडांनी केल्यानं महाविकास आघाडी सरकारमध्ये सारे काही आलबेल नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

ठाणे महापालिका निवडणुकीत संदर्भात आव्हाडांनी (TMC election) हे विधान केल्यानं चर्चांना उधाण झाले आहे. शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादी (NCP) एकत्र निवडणूक लढणार का? या विषयावर जितेंद्र आव्हाड यांनी भूमिका मांडली. यावेळी त्यांनी नाव न घेता त्यांनी शिवसेनेच्या नेत्यांना टोला लगावला. जितेंद्र आव्हाड यांच्या या विधानानंतर महाविकास आघाडीत बिघाडी असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

"इतरांची इच्छा असेल तर सोबत राहू. कुणीही राजकीय मग्रुरी दाखवू नये. शिवसेना नेते प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी कार्यकर्त्यांना समजावं", अशा शब्दांत आव्हाडांनी नाराजी व्यक्त केली आहे. ते माध्यमांशी बोलत होते.

आव्हाड म्हणाले, "जर इतरांची इच्छा असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस हात सोडणार नाही. पण कुठला पक्ष राजकीय मग्रुरीमध्ये आमची सत्ता आहे, आम्ही सत्ता आणू शकतो, आमची सत्ता होती वगैरे सांगत असेल तर मग प्रत्येकाला लढायचे मार्ग मोकळे आहेत. माझी स्थानिक आमदार प्रताप सरनाईक, शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांना विनंती आहे की, आपण शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घ्यावं आणि एक सक्षम आघाडी बनवू. वर्षोनुवर्षे महापालिका पोखरुन खाललेल्या भाजपला घरी बसवावं,"

jitendra awhad
Anil Awachat : जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांचे निधन

गेल्या काही दिवसापूर्वी कळव्यातील खारेगाव उड्डाणपुलाचा लोकार्पण कार्यक्रमात राष्ट्रवादी अन् शिवेसना कार्यकर्ते समोरासमोर आल्याने वाद निर्माण झाला होता. श्रेयवादावरुन या कार्यक्रमात बॅनरबाजी बघायला मिळाली होती. कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली होती. भाषण करताना जितेंद्र आव्हाड यांनी ठाणे महापालिकेचे महापौर नरेश म्हस्के, तसेच खासदार श्रीकांत शिंदे यांना टोला लगावला होता. त्याला श्रीकांत शिंदे यांनीदेखील उत्तर दिलं होतं. एकनाथ शिंदे यांनी परिस्थितीचं गांभीर्य लक्षात ठेवून जितेंद्र आव्हाड यांची समजूत काढली होती.

याआधी काँग्रेस नेते आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, महिला बालविकास मंत्री यशोमती ठाकूर, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीवर नाराजी व्यक्त केली होती. आता हीच धूसफूस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पोहोचल्याची चर्चा आहे. आव्हाडांच्या या विधानाननंतर आता शिवसेनेचे नेते आपल्या कार्यकर्त्यांना समजावून सांगणार का, हे लवकरच समजेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com