Chhagan Bhujbal : भुजबळांनी बाह्या सरसावल्या; पुस्तकातील दाव्यांवरून थेट कारवाईचा इशारा

Rajdeep Sardesai Book Controversy: राजदीप सरदेसाई यांच्या पुस्तकात छगन भुजबळांबाबत अनेक मोठे दावे करण्यात आले आहेत.
Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalSarkarnama
Published on
Updated on

Mumbai : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत छगन भुजबळ यांनी राजदीप सरदेसाई यांच्या पुस्तकात करण्यात आलेले सर्व दावे फेटाळून लावले आहेत. आपण अशी मुलाखत दिलीच नसल्याचे सांगत त्यांनी कारवाईचा इशारा दिला आहे. निवडणुकीच्या धामधुमीत कोणत्या उद्देशाने हे लिहिले गेले, अशी शंकाही भुजबळांनी व्यक्त केली आहे.

'द इलेक्शन दॅट सरप्राईज इंडिया' या राजदीप सरदेसाई यांच्या पुस्तकात करण्यात आलेल्या दाव्यांमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. ईडीपासून सुटका व्हावी, यासाठी आपण भाजपसोबत गेलो, असं भुजबळ यांनी सांगितल्याचा दावा पुस्तकात करण्यात आला आहे. मी ओबीसी असल्यामुळेच माझ्यावर कारवाई करण्यात आल्याचं भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी सांगितल्याचा दावाही करण्यात आला आहे.

Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal : '...म्हणून शरद पवारांची साथ सोडून भाजपसोबत गेलो', ऐन निवडणुकीच्या तोंडावर भुजबळांचा खळबळजनक दावा

पुस्तकातील सर्व दावे भुजबळांनी शुक्रवारी फेटाळून लावले. मीडियाशी बोलताना त्यांनी सांगितले की, मी अशी कुठलीही मुलाखत दिलेली नाही. ईडीपासून सुटका करण्यासाठी तिकडे गेलो, हा आरोप अनेक दिवसांपासून होत आहे. महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात उध्दव ठाकरे यांचे सरकार असतानाच मला कोर्टाने क्लीन चीट दिली आहे. त्यामुळे ईडीची भीती होती, असे काही नाही. आम्ही विकासासाठी गेलो आहे.

ज्या 54 लोकांनी सह्या केल्या होत्या, त्या सगळ्यांवर ईडीची केस नव्हती. तिकडे गेल्यानंतर आम्ही मतदारसंघाचा विकास करू शकलो. लोकांना विकास व्हायला हवा. त्यामुळे आम्ही सरकारमध्ये सामील झालो. त्याचा विकासासाठी फायदा झाला आहे आणि होत आहे, असे भुजबळांनी स्पष्ट केले आहे.

Chhagan Bhujbal
Sanjay Raut : "कमजोर हृदयाची माणसं पळून गेली"; भुजबळांचा दावा अन् राऊतांचा हल्लाबोल

हे सगळं आत्ताच का लिहिले गेले हे पाहणे महत्वाचे आहे. निवडणुकीच्या धामधुमीत याचा काय हेतू आहे, याची कल्पना नाही. फोकस चेंज करण्याच्या उद्देशाने हे करण्यात आल्याचे दिसते. हे पुस्तक मी वाचलेले नाही. त्यात काय लिहिले आहे, माहिती नाही. सात-आठ दिवसांनंतर पुस्तक वाचल्यानंतर त्यात चुकीचे जे असेल, त्यावरून मी निश्चितपणे कारवाई करणार आहे, असे भुजबळांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com