

NCP News : केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission of India) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला असलेला राष्ट्रीय राजकीय पक्षाचा दर्जा काढून घेतला आहे. यामुळे आता पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला प्रादेशिक पक्ष असणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेससोबतच (NCP News) तृणमूल काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पक्ष या पक्षांनी देखील आपला राष्ट्रीय पक्षाची ओळख गमावली आहे. (NCP Has Remove National Party Status)
या प्रमुख तीन पक्षांनी आपली राष्ट्रीय पक्ष म्हणून ओळख गमावली असताना, दुसरीकडे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला निवडणूक आयोगाने राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता बहाल केली आहे. आता राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गमावल्याने राष्ट्रवादीपुढे अडचणी निर्माण झाल्या आहेत. राष्ट्रीय पक्ष म्हणून, राष्ट्रवादीला काही सवलती आता गमवाव्या लागणार आहेत.
राष्ट्रीय पक्षाचा दर्जा असलेल्या पक्षांना काही सवलती आयोगाकडून मिळतात..
1) राष्ट्रीय पक्ष असा दर्जा काही निकषांवर मिळत असतात. असा दर्जा मिळाल्यानंतर त्या पक्षाचे निवडणूक चिन्हं, संपूर्ण देशभरात कायम राहिला जातो. या चिन्हावर इतर पक्ष किंवा उमेदवार दावा करू शकत नाहीत. मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेसचं घडयाळ चिन्ह राखीव नसणार.
2) राष्ट्रीय पक्षाच्या दर्जामुळे राष्ट्रीय पक्षांना निवडणूकीत 40 स्टार प्रचारकांची नेमणूक करता येते. या स्टार प्रचारकांचा खर्च
उमेदवारांच्या निवडणूक खर्चातून न होता, तो पक्षीय निधीतून केला जातो. मात्र आता राष्ट्रवादी कांग्रेसला यावर बंधने येणार आहेत.
3) देशभरातील सार्वत्रिक निवडणुकीच्या काळात दूरदर्शन आणि ऑल इंडिया रेडीओवर पक्षाच्या प्रचारासाठी काही निश्चिच वेळ उपलब्ध केला जात होता. मात्र आता ही सवलत राष्ट्रवादीला मिळणार नाही.
4) राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाल्यानंतर त्या संबंधित पक्षाचं मुख्यालय उभारणीसाठी काही प्रमाणात सवलतीच्या दरामध्ये सरकारी जमीन उपलब्ध होते. मात्र आता राष्ट्रवादीला ही सवलत गमवावी लागणार आहे.
5) राष्ट्रीय पक्ष अशी ओळख असल्याने राष्ट्रवादीला काँग्रेसला निवडणूक आयोगाकडून मतदार याद्या या मोफत उपलब्ध होत होत्या, मात्र यापुढे या याद्या मोफत मिळणार नाहीत. (Latest Maharashtra News)
पक्षाला राष्ट्रीय दर्जा मिळण्याचे निकष काय असतात ?
लोकसभा निवडणुकीत किमान ३ राज्यांमध्ये २ टक्के जागांवर विजय मिळवणे आवश्यक आहे. लोकसभेत किमान चार जागा आणि किमान सहा टक्के मते मिळाली पाहिजे. पक्षाला ४ किंवा अधिक राज्यांमध्ये प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता मिळणे आवश्यक आहे. किमान चार राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीत सहा टक्क्यांपेक्षा अधिक मते मिळणे गरजेचे असे. यातील एक निकष पूर्ण करणाऱ्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळतो. राष्ट्रीय पक्षाचा दर्जा असला की पक्षाला देशभरात एकाच चिन्हावर निवडणूक लढवता येते. तसेच, राजधानी दिल्लीत पक्ष कार्यालयासाठी जागा मिळते. त्यामुळे, प्रत्येक पक्ष हा दर्जा टिकवण्यासाठी प्रयत्न करत असतो. (Political Breaking News)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.