Omraje Nimbalkar : 'नीट'च्या विद्यार्थ्यांसाठी ओमराजे आले धावून; केली 'ही' मागणी

NEET Result 2024 Controversy : NEET परीक्षा भारतातील सर्वात मोठी असण्याबरोबर वैद्यकीय व्यावसायिक शिक्षण घेण्याकरिता अत्यंत महत्त्वाची समजली जाते. परीक्षेत देण्यात आलेल्या ग्रेस मार्क्सचा आढावा उच्चस्तरीय समितीमार्फत घेऊन विद्यार्थ्यांना न्याय द्या.
MP Omraje Nimbalkar
MP Omraje NimbalkarSarkarnama

Dharashiv News, 10 June : नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NEET) तर्फे चार मे रोजी देशभरात परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षा प्रक्रियेबाबत अनेक तक्रारी येत आहेत. अतिशय महत्वाच्या परीक्षेत गैरप्रकार होणे हे दुर्दैवी आहे. त्यामुळे या परीक्षेत झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करावी, अशी मागणी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सरकारकडे केली आहे.

देशातल्या 571 शहरातील एकूण चार हजार 750 केंद्रावर 24 लाख सहा हजार 79 विद्यार्थ्यांपैकी 23 लाख 31 हजार 297 विद्यार्थ्यांनी नीटची परीक्षा दिली. परीक्षेचा निकाल 14 जूनला अपेक्षित असताना संबंधित एजन्सीने या परीक्षेचा निकाल 4 जून रोजी जाहीर केला. परीक्षेत देशात 67 विद्यार्थ्यांना 720 पैकी 720 मार्क्स मिळाले आहेत.

दीड हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क्स दिले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांना परीक्षेमध्ये गैरप्रकार झाल्याचा संशय आहे. हरियाणातील एका केंद्रावरील प्रश्नपत्रिका उशिरा दिल्याचे कारण देऊन ग्रेस मार्क दिल्यामुळे चार विद्यार्थ्यांना 720 पैकी 720 मार्क मिळाले आहेत.

व्यावसायिक परीक्षा सिस्टिम ऑफ एलिमिनेशनवर आधारित आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना 718-719 असे गुण प्रदान करण्यात आल्यामुळे पालक व विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये गैरप्रकार झाल्याची शंका आहे. पालकांकडून व विद्यार्थ्यांकडून ही परीक्षा रद्द करून पुन्हा परीक्षा घेण्याबाबत विनंती करण्यात येत आहे.

MP Omraje Nimbalkar
Ajit Pawar : अजितदादा आकड्यांचा खेळ करणार; खासदारांची संख्या 'अशी' वाढवणार

ही परीक्षा भारतातील सर्वात मोठी असण्याबरोबर वैद्यकीय व्यावसायिक शिक्षण घेण्याकरिता अत्यंत महत्त्वाची समजली जाते. परीक्षेत देण्यात आलेल्या ग्रेस मार्क्सचा आढावा उच्चस्तरीय समितीमार्फत घेऊन विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी करणारे पत्र खासदार ओमराजे निंबाळकर (Omraj Nimbalkar) यांनी 'नीट'चे महानिदेशकांना पाठवलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com