Uttar Pradesh : `युपी में का बा`,चे उत्तर मिळाले, युपी मे फिरसे `बाबा`

८ फेब्रुवारी भोजपुरी गायिका नेहा सिंह राठौड हिन गायलेल्या युपी में का बा या गाण्यात राज्यातील विविध मुद्यांना हात घालण्यात आला होता. (Uttar Pradesh)
Neha Singh Ratohd-Yogi Adityanath
Neha Singh Ratohd-Yogi AdityanathSarkarnama
Published on
Updated on

औरंगाबाद : उत्तर प्रदेश राज्यातील निवडणूक प्रचार यावेळी चागंलाच गाजला. एकीकडे सत्ताधारी भाजपकडून राज्यात सुधारलेली कायदा व सुव्यवस्था, झालेली विकास कामे, गुंडगर्दीला बसलेला लगाम आदी मुद्दे प्रामुख्याने पुढे केले गेले. (Uttar Pradesh) तर दुसरीकडे विरोधकांकडून कोरोना काळात झालेले मृत्यू त्यांचे गंगा नदीत फेकण्यात आलेले मृतदेह ते महागाई व इतर मुद्यांवर जोर देण्यात आला होता. (Yogi Adityanath) या शिवाय नेहा सिंह राठोड यांच्या युपी मे का बा? असा सवाल विचारणारे गाणे चांगलेच हीट झाले होते. (Bjp)

नेहा सिंह राठौड यांनी आपल्या गाण्यातून योगी सरकारवर निशाणा साधला होता. प्रचारात या गाण्याने अक्षरशा धुमाकूळ घातला होता. सोशल मिडियावर ट्रेंडमध्ये राहिलेल्या या गाण्याला लोकांना अक्षरशः डोक्यावर घेतले होते. सुपरहीट झालेले हे गाणे मतदारांवर किती परिणाम करते याकडे देखील सगळ्यांचे लक्ष लागले होते.

परंतु आज प्रत्यक्षात जेव्हा युपीचा निकाल जाहीर झालाय त्यात मात्र युपी मे का बा चे उत्तर युपी मे फिरसे बाबा, ने मिळाल्याचे दिसून आले आहे. ८ फेब्रुवारी भोजपुरी गायिका नेहा सिंह राठौड हिन गायलेल्या युपी में का बा या गाण्यात राज्यातील विविध मुद्यांना हात घालण्यात आला होता. भाजपसाठी हे प्रचार गीत डोकेदुखी ठरते की काय? इतके प्रसिद्ध झाले होते.

Neha Singh Ratohd-Yogi Adityanath
आता केजरीवालांचा शिवसेना भवनात सत्कार करतील, युवराज हत्तीवरून साखर वाटतील..

परंतु लोकांना या गीताला डोक्यावर घेतले असले तरी मतदारांनी मात्र ते फारसे मनावर घेतले नाही. उत्तर प्रदेशात योगींच्या नेतृत्वाखाली पुन्हा भाजपची सत्ता प्रस्थापित झाली आहे. योगी आदित्यनाथ दुसऱ्यांना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होणार आहेत. त्यामुळे युपी मे का बा, याचे उत्तर प्रदेशच्या जनतेने युपी मे सिर्फ बाबा ने प्रत्युत्तर दिल्याची चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com