Maharashtra Assembly Election 2024 : है तयार हम; भाजप 'इलेक्शन' मोडवर

For Assembly Election 2024 BJP Raosaheb Danve has confirmed the responsibility of various committees : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने विविध जबाबदाऱ्यांचे वाटप केले असून, नितीन गडकरी, देवेंद फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना मानाचे स्थान असणार आहे.
bjp
bjpSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : विधानसभा निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी माजी मंत्री रावसाहेब दानवे यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या भाजपच्या निवडणूक समितीने आज उपसमित्यांची घोषणा केली. जाहिरनामा समितीच्या प्रमुखपदी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना नेमण्यात आले आहे.

महायुतीच्या समन्वयक पदाची जबाबदारी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यावर सोपविण्यात आली आहे. मुख्य समितीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे विशेष निमंत्रित असतील.

निवडणुकीच्या संचालन समितीच्या सहप्रमुख पदावर आदिवासी समाजातील अशोक नेते, दलित समाजातील दिलीप आणि विधान परिषदेचे सदस्य श्रीकांत भारतीय यांची नेमणूक करण्यात आली.राज्यातील कार्यकर्त्यांना प्रतिनिधित्व देणाऱ्या या यादीची घोषणा रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी पत्रकारांशी बोलताना केली. निवडणूक आयोगाशी असलेल्या कामांवर देखरेख करण्यासाठी विश्वास पाठक यांची नेमणूक करण्यात आली आहे, तर सोशल मीडियाच्या प्रमुख पदाची जबाबदारी निरंजन डावखरे यांना देण्यात आली आहे.

bjp
Assembly Election : डबल धमाका! राहुल गांधी, नरेंद्र मोदी महाराष्ट्रात; काय बोलणार?

'लोकसभेप्रमाणे कोणत्याही चुका राहू नयेत, यासाठी सर्व दिशांनी विचार करत समिती तयार झाली, असून महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाची सत्ता पुन्हा येईल', असा विश्वास दानवे यांनी व्यक्त केला. भाजप (BJP) महायुतीतील सर्व मित्रपक्षांना घेऊन 248 विधानसभा मतदारसंघांमध्ये आपलाच उमेदवार लढत असल्याच्या भूमिकेतून पावले टाकणार आहे, असेही ते म्हणाले.

bjp
Amaravati : पोलिस ठाण्यावर जमावाची तुफान दगडफेक; 29 कर्मचारी जखमी, पोलिस व्हॅन, दुचाकी फोडल्या

अशोक चव्हाण यांच्याकडे कृषी समिती

काँग्रेसमधून भाजप आलेल्या माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना कृषी संयोजन समितीचे प्रमुख करण्यात आले आहे. प्रचार समिती या अत्यंत महत्त्वाच्या समितीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे देण्यात आली आहे, तर मंत्री राधाकृष्ण विखे तसेच चंद्रकांत पाटील विशेष संपर्क समितीचे प्रमुख असतील. या संपूर्ण समितीच्या संचालनासाठी जी सुकाणू समिती नेमली आहे, त्याच्यावर माधव भंडारी यांना नेमण्यात आले आहे.

मुंडे, विखेंवर मोठी जबाबदारी

ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांची समन्वय जबाबदारी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ सांभाळतील. विविध समाज गटांशी संपर्क साधण्याची जबाबदारी आमदार पंकजा मुंडे यांना देण्यात आली आहे, तर लाभार्थींना समवेत घेऊन संपर्क मोहीम राबवायची आहे, त्याची जबाबदारी मंत्री राधाकृष्ण विखे यांच्यावर असेल.

महिला आघाडी प्रमुख, अशी राष्ट्रीय जबाबदारी सांभाळलेल्या विजया रहाटकर यांना महिला विभागाकडे लक्ष द्या, असे सांगण्यात आले आहे. सहकार संपर्क समिती प्रमुख म्हणून प्रवीण दरेकर काम करतील, तर नागरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांची जबाबदारी प्रसाद लाड यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. क्रीडा समन्वयाची जबाबदारी केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्याकडे असेल, तर प्रसिद्धी माध्यमांशी संपर्क साधण्याची जबाबदारी आमदार अतुल भातखळकर यांची असेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com