Political News : राज्यातील 'या' तीन नेत्यांनाच होता आले चारही सभागृहांचे सदस्य

Loksabha News : संसदेच्या राज्यसभा, लोकसभा व विधिमंडळाच्या विधानपरिषद व विधानसभा या चार सभागृहाचे सदस्य होण्याचे भाग्य देशातील खूप कमी नेतेमंडळींना लाभले आहे.
sansad, vidhansabha
sansad, vidhansabha Sarkaranama
Published on
Updated on

Mumbai News : संसदेच्या राज्यसभा, लोकसभा व विधिमंडळाच्या विधानपरिषद व विधानसभा या चार सभागृहाचे सदस्य होण्याचे भाग्य देशातील खूप कमी नेतेमंडळींना लाभले आहे. त्यासोबतच महाराष्ट्रातील केवळ तीन नेत्यांना या चार सभागृहाचे सदस्य होता आले आहे. विशेष म्हणजे त्या मध्ये राज्यातील दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या पिता-पुत्रांचा समावेश आहे.

माजी केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण आणि अशोक चव्हाण या पितापुत्राची दोनवेळा राज्याच्या मुख्यमंत्रीपद वर्णी लागली आहे. अशास्वरुपचा एक अनोखा विक्रम त्यांच्या नावे आहे. त्यासोबतच आता चारही सभागृहाचे सदस्य होण्याचा बहुमान माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्यासह माजी केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण आणि त्यांचे पुत्र अशोक चव्हाण या तीन नेत्याच्या नावे आहे. हा ही एक योगायोग मानला जात आहे.

sansad, vidhansabha
Eknath Shinde : सायंकाळच्या लग्न सोहळ्याला मुख्यमंत्री शिंदेंची रात्री साडेबाराला हजेरी

अशोक चव्हाण यांना वडिलांच्या पदाची बरोबरी करताना आता केंद्रीय मंत्रिपद स्वीकारायचे आहे. ते केंद्रीय मंत्री झाल्यानंतर वडिलांनी भूषविलेल्या पदांची बरोबरी त्यांना करता येणार आहे.

दिवंगत नेते शंकरराव चव्हाण हे राज्याचे दोन वेळा मुख्यमंत्री होते. तर पाच वेळा विधानसभेचे सदस्य होते. एक वेळा विधान परिषदेचे सदस्य होते तर दोन वेळा लोकसभेवर निवडून गेले तर तीन वेळा ते राज्यसभेचे खासदार होते. त्यांची राजकीय कारकीर्द 46 वर्षाची राहिली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

माजी केंद्रीय मंत्री शरद पवार (Sharad Pawar) हे देखील राज्याचे तीन वेळा मुख्यमंत्री होते. ते चारही सभागृहाचे सदस्य राहिले आहेत. सहा वेळा ते विधानसभेचे सदस्य होते. एकदा त्यांनी विधानपरिषदेचे सदस्यपद भूषवले आहे. सात वेळा ते लोकसभेचे सदस्य राहिले आहेत तर दोन वेळा ते राज्यसभेवर निवडून गेले आहेत. सध्या ते राज्यसभेचे सदस्य आहेत. त्यांनी केंद्रीयमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. त्यांची राजकीय कारकीर्द ५० वर्षापेक्षा अधिक काळाची राहिली आहे.

अशोक चव्हाण (Ashok Chavhan) हे दोन वेळा मुख्यमंत्री होते. तर चार वेळा विधानसभेचे सदस्य होते. एक वेळा विधान परिषदेचे सदस्य होते तर दोन वेळा लोकसभेवर निवडून गेले तर आता राज्यसभेचे खासदार होणार आहेत. त्यांची राजकीय कारकीर्द ३८ वर्षाची राहिली आहे.

sansad, vidhansabha
Ashok Chavhan Resignation : चव्हाणांनंतर यशोमती ठाकूरांनी ठरविले की...

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com