BJP Political News : भाजपच्या नेत्या व माजी मंत्री पंकजा मुंडे या परळीत आयोजित करण्यात आलेल्या 'शासन आपल्या दारी' या कार्यक्रमानंतर पुन्हा एकदा सक्रिय झालेल्या दिसत आहेत. या कार्यक्रमात त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मुंबईवरून येताना एकत्रित प्रवास केल्याने.
दोघांत ताणले गेलेले संबंध काहीसे सुरळीत झाल्याचे चित्र सध्या दिसत आहे. देवेंद्र फडवणीस, पंकजा मुंडे यांच्यातील ताणलेले संबंध सुरळीत करण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुढाकार घेतला असल्याचे समजते.
नागपूरमध्ये महाराष्ट्रातील भाजप पक्ष संघटनेच्या प्रमुख पदधिकाऱ्यांची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत तीन राज्यात झालेल्या निवडणुकीत भाजपने यश संपादन केल्याने सर्वांचा उत्साह दुणावला होता. यावेळी माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी देखील दोन पावले पुढं येत राज्यातील भाजप पक्ष संघटनेसोबत असलेला दुरावा संपवल्याचे चित्र आहे.
या बैठकीप्रसंगी पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी पदाधिकाऱ्यात जोश निर्माण करणारे मार्गदर्शन केले. त्यासोबतचा गेल्या काही दिवसात पक्षाच्या लहान मोठ्या पदाधिकाऱ्याना कामाचा खूप ताण आहे.
हा ताण थोडा कमी करावा, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्ती केली. आगामी काळात लोकसभा व विधानसभा निवडणुका असल्याने कार्यकर्त्यांना ताण येईल असे काम देऊ नये, असे सांगितले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
देवेंद्र फडवणीस (Devendra Fadanvis) आणि पंकजा मुंडे यांच्यात गेल्या काही दिवसापासून असलेला दुरावा संपल्यामुळे पंकजा मुंडे या बैठकीत भरभरून बोलल्या. फडवणीस आणि मुंडे यांच्यातील ताणलेले संबंध सुरळीत करण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुढाकार घेतला होता.
त्यांची मध्यस्थी या निमित्ताने कामी आल्याची चर्चा बैठकीप्रसंगी ऐकावयास मिळाली. त्यामुळे आता येत्या काळात पंकजा मुंडे उत्स्फूर्तपणे भाजपच्या बैठका व कार्यक्रमात सहभागी होतील, असे चित्र दिसत आहे.
(Edited by Sachin Waghmare)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.