Market Committee Election : दुधनीत म्हेत्रे गटाच्या दोन जागा बिनविरोध; मात्र कल्याणशेट्टींचे कडवे आव्हान : अक्कलकोटला सिद्रामप्पांविरोधात तानवडे-पाटील-शिंदे

दुधनी बाजार समितीसाठी माजी राज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यात मोठी लढाई होण्याची शक्यता आहे.
Siddharam Mhetre-Sachin Kalyanshetti-Sidramappa Patil
Siddharam Mhetre-Sachin Kalyanshetti-Sidramappa PatilSarkarnama

अक्कलकोट (जि. सोलापूर) : अक्कलकोट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांसाठी १०६ अर्ज, तर दुधनी बाजार समितीच्या १८ जागांसाठी ७९ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आज शेवटचा दिवस होता. (106 applications filed for Akkalkot Market Committee and 79 applications for Dudhni)

अक्कलकोट (जि. सोलापूर) : अक्कलकोट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांसाठी १०६ अर्ज, तर दुधनी बाजार समितीच्या १८ जागांसाठी ७९ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आज शेवटचा दिवस होता. (106 applications filed for Akkalkot Bazar Committee and 79 applications for Dudhni)

Siddharam Mhetre-Sachin Kalyanshetti-Sidramappa Patil
Rajan Patil News : राजन पाटलांनी पुन्हा ताकद दाखवली : मोहोळ बाजार समिती बिनविरोध; ७५ वर्षांपासून वर्चस्व कायम

दुधनी बाजार समितीसाठी माजी राज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यात मोठी लढाई होण्याची शक्यता आहे. माजी राज्यमंत्री म्हेत्रे आणि काँग्रेस तालुकाध्यक्ष शंकर म्हेत्रे यांच्या दुधनीतील होम पिचवर भाजपचे आमदार सचिन कल्याणशेट्टी हे जोरदार आव्हान देण्याच्या तयारीत आहेत.

दुधनी बाजार समितीमध्ये शिरकाव करू पाहणारे भाजपचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचा बाजार समितीत पराभव करून विधानसभेच्या मैदानात जोरदार आव्हान उभे करण्याचा प्रयत्न म्हेत्रे बंधू करीत आहेत. दुधनी बाजार समितीची ही निवडणूक माजी राज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे व शंकर म्हेत्रे यांच्या राजकिय अस्तित्वाची ठरणार आहे. याची जाणीव दोन्ही बाजूकडील नेतेमंडळींना असल्याने दोन्ही बाजूने जोरदार तयारी करण्यात येत आहे.

Siddharam Mhetre-Sachin Kalyanshetti-Sidramappa Patil
Solapur News : पंतप्रधान मोदींना सोलापुरातून पाठवली पाच हजार पत्रे : प्रणिती शिंदेंच्या नेतृत्वाखाली युवक काँग्रेसचा उपक्रम

उमलते नेतृत्व प्रथमेश शंकर म्हेत्रे व शीतल सिद्धाराम म्हेत्रे यांची या निवडणुकीत म्हेत्रे गटाला साथ मिळत आहे. दुधनी बाजार समितीसाठी आमदार कल्याणशेट्टी यांना माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांनी पाठिंबा दर्शविला आहे.

अक्कलकोट कृषी उत्पन्न बाजार समितीवर पुन्हा झेंडा फडकविण्यासाठी माजी आमदार सिद्रामप्पा पाटील व त्यांचे चिरंजीव माजी सभापती संजीव पाटील हे प्रयत्नशील आहेत. त्यांना आव्हान देण्यासाठी माजी राज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या पाठिंब्याने माजी जिल्हा परिषद सदस्य मल्लिकार्जुन पाटील, जिल्हा परिषदेचे माजी पक्षनेते आनंद तानवडे, जनसेवा संघटनेचे तुकाराम बिराजदार व गोकुळ शुगरचे कपिल शिंदे हे एकत्र आले आहेत.

Siddharam Mhetre-Sachin Kalyanshetti-Sidramappa Patil
Arvind Sawant on controversial statement : तो शब्द शरद पवारांचा नव्हे; तर माझा : अरविंद सावंतांनी वादावर टाकला पडदा

अक्कलकोट बाजार समितीसाठी माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांना आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे पाठबळ मिळणार आहे. शिवसेनेचे तालुकाप्रमुख संजय देशमुख यांनी अक्कलकोट बाजार समितीची निवडणूक स्वतंत्रपणे लढविण्याचा विचार केला असून त्यांच्या अनेक उमेदवारांनी शक्तीप्रदर्शन करीत वाजत गाजत अर्ज दाखल केले आहेत.

Siddharam Mhetre-Sachin Kalyanshetti-Sidramappa Patil
Subhash Deshmukh Statement : भाजप आमदार सुभाष देशमुखांचं अजब वक्तव्य : ‘फडणवीस यंदा महिलांवर प्रचंड फिदा झालेत...’

प्रकाश पाटील (शेगाव), सुरेश गड्डी, शिवयोगी लालसंगी, शकुंतला खरात, प्रकाश दुपारगुडे, बसवराज पाटील आळगी, म्हाळप्पा पुजारी, प्रथमेश म्हेत्रे, शंकर म्हेत्रे, राजकुमार लकाबशेट्टी, सुनील बंडगर, भाजपचे तालुकाध्यक्ष मोतीराम राठोड, माजी नगराध्यक्ष सुवर्णा मलगोंडा, शिवसेना तालुकाप्रमुख संजय देशमुख, शंकर माशाळे, बसवराज माशाळे, दिलीप पाटील, संजीव पाटील आदींसह अनेक उमेदवारांनी दुधनी व अक्कलकोट बाजार समितीसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. येत्या पाच एप्रिल रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com