नगर जिल्ह्यातील 18 विद्यार्थी अडकले युक्रेनमध्ये : पालकांच्या वाढल्या चिंता

रशिया-युक्रेन वाद वाढू लागला आहे. जगाला या वादामुळे महायुद्धाची चिंता वाटत आहे.
Russia Ukraine Crisis
Russia Ukraine Crisis Sarkarnama

अहमदनगर - रशिया-युक्रेन वाद वाढू लागला आहे. जगाला या वादामुळे महायुद्धाची चिंता वाटत आहे. अशात अहमदनगरमधील एक शिक्षण विषयक काम करणाऱ्या संस्थेने 40 विद्यार्थी युक्रेनला पाठविले होते. हे विद्यार्थी युक्रेन मध्ये अडकले आहेत. यात अहमदनगर शहर व जिल्ह्यातील 16 ते 18 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. युद्ध परिस्थितीमुळे या विद्यार्थ्यांच्या पालकांची चिंता वाढली आहे. ( 18 students from Nagar district stranded in Ukraine )

रशिया व युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाले असून अहमदनगर जिल्ह्यातील युक्रेनमध्ये अनेक विद्यार्थी अडकले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. अहमदनगरमधील झोपडी कॅन्टीन परिसरातील एड्युकॉन एज्युकेशनल कन्सल्टन्सी संस्थेचे डॉ. महेंद्र झावरे पाटील यांच्या मार्फत 40 विद्यार्थी युक्रेनमध्ये शिक्षणासाठी गेले आहेत यापैकी जवळपास 16 ते 18 विद्यार्थी अहमदनगर शहर आणि जिल्ह्यातील आहेत.

Russia Ukraine Crisis
...म्हणून थोरातांच्या कारखान्यात विखे होते चेअरमन

युद्ध परिस्थितीमुळे युक्रेनमधील मॉलमध्ये खाद्यपदार्थही मिळणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत या विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्याची मागणी डॉ. महेश झावरे व पालकांकडून होऊ लागली आहे. विद्यार्थ्यांकडून मायदेशी परत येण्याची धडपड सुरू आहे.

Russia Ukraine Crisis
रशिया युक्रेन संघर्ष चिघळला: राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांची मोठी घोषणा

मी युक्रेनमध्ये एमबीबीएसच्या पहिल्या वर्षाला आहे. युक्रेनमध्ये युध्दाची स्थिती आहे. लोक चिंतेत आहेत. येथील सुपर मार्केट बंद होत चालले आहेत. त्यातील किराणाही संपत चालला आहे. येथे वस्तू महाग मिळत आहेत. येथे एटीएम बाहेर मोठ्या रांगा लागल्या आहेत. भारतीय एटीएम कार्डही बंद पडत चालले आहेत.

- योगीता काळे, अहमदनगरमधील मूळ रहिवासी सध्या युक्रेनमध्ये विद्यार्थी

मी युक्रेनमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेत आहे. युक्रेन व रशियाच्या युद्ध परिस्थितीमुळे आमचे शिक्षण व जनजीवन विस्कळीत झाले आहे. आमचे पालकही खूप चिंतेत आहेत. भारतीय दुतावासाकडून सांगण्यात आले हे की आम्हाला येथून बाहेर काढले जाईल. त्यासाठी आम्हाला युक्रेनच्या पश्चिम भागात नेणार आहेत. भारतीय दुतावासाने विमानाची सोय करून आम्हाला आमच्या देशी घेऊन जावे ही आमची मागणी आहे.

- वेदांती मुळे, पुण्यातील मूळ रहिवासी सध्या युक्रेनमध्ये विद्यार्थी

रशिया युक्रेन वादाचा युक्रेन मध्ये अडकलेल्या शालेय विद्यार्थ्यांना मोठा फटका बसला असून युक्रेन मध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांकडून भारत सरकारला फ्लाइट ने मायदेशात आणण्याची विनंती केलीय तर दुसरीकडे मात्र या विद्यार्थ्यांकडे पैसेही नसून एटीएम बाहेर पैशासाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत तर पैसे मिळत नसल्याने विद्यार्थ्यांना मोठा त्रास याठिकाणी सहन करावा लागत आहे.

- साक्षी बोराटे, पुण्यातील मूळ रहिवासी सध्या युक्रेनमध्ये विद्यार्थी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com