शहाजीबापूंसाठी एकनाथ शिंदेंनी सोडला हात सैल; पाणी योजनेस ३०० कोटी निधीची मान्यता

सांगोला तालुक्याची वरदायिनी म्हणून ओळखली जाणारी ८१ गावची शिरभावी प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजना कायमस्वरूपी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडेच राहणार आहे.
Shahaji Patil-Eknath shinde
Shahaji Patil-Eknath shindeSarkarnama

सांगोला (जि. सोलापूर) : सांगोला (sangola) तालुक्याची वरदायिनी म्हणून ओळखली जाणारी ८१ गावची शिरभावी प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजना कायमस्वरूपी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडेच राहणार आहे. या योजनेसाठी सुमारे २९९ कोटी ६० लाख रुपये निधीस  प्रशासकीय मान्यता मिळाली आहे, अशी माहिती आमदार शहाजी पाटील (shahaji Patil) यांनी पत्रकार परिषदेत दिली. (300 crore fund approved for water scheme in Sangola taluka)

 मंजूर निधीतून सध्या सुमारे ९० कोटी २८ लाख रुपयाची  निविदा प्रसिद्ध झाली असून त्यामध्ये सिव्हिलच्या कामासाठी ७७ कोटी ६४ लाख रुपये, मेकॅनिकल कामासाठी १२ कोटी ६४ लाख आणि १६५ कोटींचे पाईप सरकार स्वतः या कामासाठी देणार आहे, असा एकूण सुमारे २९९ कोटी ६० लाख रुपये म्हणजेच जवळपास ३०० कोटींचा निधी मंजूर झाला आहे.  सांगोला तालुक्यातील नागरिकांना प्रति माणसी ५५ लिटर शुद्ध पाणी मिळणार आहे. तालुक्याच्या दृष्टीने महत्वाची योजना मार्गी लागली आहे.

Shahaji Patil-Eknath shinde
...तर अजितदादांनी सगळी शिवसेना खाऊन टाकली असती : रामदास कदमांचा आरोप

 सांगोला तालुक्यातील १०२ गावांसाठी वरदायिनी असणारी शिरभावी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना आमदार शहाजी पाटील प्रथम निवडून आल्यानंतर पाठपुरावा करत १९९९ मध्ये योजनेसाठी सुमारे ९९ कोटी रुपये मंजूर करून घेतले. या योजनेचे काम पूर्ण होऊन २००३ मध्ये ही योजना कार्यान्वित झाली. सांगोला तालुक्यातील शिरभावीसह ८१ गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागला. 

Shahaji Patil-Eknath shinde
बुलडाणा हा बिहार नाही; हल्ल्याचा उद्रेक संपूर्ण जिल्ह्यात होईल : शिवसेनेचा इशारा

या योजनेची मुदत २०३० पर्यंत होती. परंतु योजनेचे पंप,  गळती, पाईप लागलेला गंज या गोष्टींसाठी सरकारकडून आर्थिक भरीव तरतूद होत नसल्याने योजना तोट्यात चालली होती. याचा विचार करून सरकारने ही योजना जिल्हा परिषदकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला होता. आमदार शहाजी पाटील यांनी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना आपल्या वाढदिवसानिमित्त सांगोला येथे निमंत्रित केले. त्यावेळी आयोजित शेतकरी मेळाव्यात पाटील यांनी ही योजना जर जिल्हा परिषदकडे वर्ग केली तर होणाऱ्या परिणामाकडे लक्ष वेधून ही योजना कायमस्वरूपी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे ठेवावी, असा आग्रह केला होता. त्यावरही योजना कायमस्वरूपी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडेच राहिली व याला भरघोस निधी मिळाला असल्याने या योजनेमुळे तालुक्यातील घराघरांत शुद्ध पाणी पोचणार आहे, असे आमदार पाटील यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com