Pandharpur Politics : अभिजीत पाटलांनी केला भालके-काळेंचा करेक्ट कार्यक्रम; धोत्रेंना गळाला लावत दिला धक्का!

Pandharpur Market Committee : पंढरपूर बाजार समितीच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट
Pandharpur Politics
Pandharpur PoliticsSarkarnama

Pandharpur News : राज्यात सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीत अनेक राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. असे असतानाच पंढरपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट आला आहे.

पंढरपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी अवघे दोन दिवस बाकी आहेत. त्याआधीच ऐनवेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दोन उमेदवारांनी या निवडणुकीतून माघार घेतली आहे. मनसेच्या या दोन उमेदवारांनी निवडणुकीतून माघार माघार घेतल्यामुळे तालुक्याच्या राजकारणात उलट-सुलट प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

Pandharpur Politics
Rajaram Sugar Factory : संपूर्ण ताकद लाऊनही महाडिकांनी सतेज पाटलांना चिटपट केलेच; 'हे' फॅक्टर ठरले महत्त्वाचे

बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये सत्ताधारी परिचारक गटाच्या विरोधात विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी 12 उमेदवार तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप धोत्रे यांच्या गटाचे दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. विठ्ठल परिवाराचे नेते कल्याणराव काळे व भगीरथ भालके यांनी मात्र, या निवडणुकीत तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. त्यामुळे परिचारक गटाचा विजयाचा मार्ग आणखी सोपा झाला आहे.

बाजार समितीची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी तालुक्यातील सर्व गटाच्या नेत्यांना आवाहन केलं होतं. तरीही ही निवडणूक लागली. यामध्ये प्रामुख्याने अभिजीत पाटील यांनी या निवडणुकीमध्ये परिचारकांच्या विरोधात आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तर दुसऱीकडे मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनीही परिचारकांच्या विरोधात दोन उमेदवार देऊन निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली.

Pandharpur Politics
Abdul Sattar News : सत्तार मतदारसंघात भाजपला विचारेना, नड्डा, बावनकुळेंकडे तक्रार करणार..

मात्र, या निवडणुकीमध्ये अभिजीत पाटील आणि मनसेच्या उमेदवारांमध्ये मत विभागणी होऊन परिचारक गटाचा फायदा होवू नये, यासाठी ऐनवेळी मनसेचे उमेदवार शशिकांत पाटील व अरुण बागल या दोन उमेदवारांनी निवडणुकीतून आपण माघार घेत असून अभिजीत पाटील यांच्या गटाच्या उमेदवारांना पाठिंबा देत असल्याचे पत्रकाद्वारे जाहीर केले.

दरम्यान, बाजार समितीसाठी 28 एप्रिलला मतदान होणार आहे. उद्या जाहीर प्रचाराचा अंतिम दिवस आहे. परिचारक गटाने तालुक्यामध्ये आतापर्यंत दोन मोठ्या सभा व बैठका घेऊन निवडणुकीची मोर्चे बांधणी केली. तर तिकडे विरोधी अभिजीत पाटील गटात अजूनही कमालीची शांतता आहे. अशातच मनसेने निवडणुकीतून माघार घेतल्यामुळे या निवडणुकीत मोठा ट्विस्ट आला आहे.

Pandharpur Politics
Sujay Vikhe News: बाजार समितीच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला! लकेंच्या बालेकिल्ल्यात जावून खासदार विखेंनी सुनावलं

धोत्रेंनी घेतली भालके-काळे गटापासून फारकत?

मागील काही वर्षांपासून तालुक्याच्या राजकारणामध्ये मनसेचे नेते दिलीप धोत्रे हे प्रत्येक निवडणुकीमध्ये भालके -काळे गटासोबत राहिले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये देखील धोत्रे यांनी भालके-काळेंना सोबत घेऊन निवडणुकीची रणनीती आखली होती. त्या पद्धतीने तसे त्यांचे प्रयत्न सुरू होते.

बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये देखील धोत्रे यांनी अभिजीत पाटील, कल्याणराव काळे आणि भगीरथ भालके या प्रमुख नेत्यांना एकत्र करून निवडणूक लढविण्यासाठी प्रयत्न केले होते. पण यामध्ये धोत्रे यांना शेवटपर्यंत यश आले नाही.

याच दरम्यान भालके -काळे यांनी बाजार समितीच्या निवडणुकीत मनसेच्या उमेदवारांना पाठिंबा द्यावा, अशी अपेक्षा धोत्रेंनी व्यक्त केली होती. त्यानंतरही भालके-काळे यांनी मनसेच्या उमेदवारांना पाठिंबा न देता तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. त्यामुळे नाराज झालेल्या धोत्रे यांनी आज भालके-काळे यांचे विरोधक असलेले अभिजीत पाटील यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. दिलीप धोत्रे यांच्यामुळे पाटील गटाची ताकद वाढली आहे.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com