Chandrakant Patil News : चंद्रकांत पाटलांनी करुन दाखवलं; कोल्हापुरात भाजपाचे पहिले कार्यालय साकारले

Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यातील भाजपाच्या सर्व कार्यकर्त्यांसाठी नागाळा पार्क येथे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असे कार्यालय उभारण्यात आले आहे.
Chandrakant Patil News
Chandrakant Patil NewsSarkarnama
Published on
Updated on

BJP Office Kolhapur News : कोल्हापूर मधील नागाळा पार्क येथे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज अशा राज्यातील भाजपा कार्यकर्त्यांसाठी पहिल्या समर्पित नवीन जिल्हा कार्यालयाचा शुभारंभ राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. आगामी काळात हे कार्यालय लोकसवेचे प्रमुख केंद्र ठरेल, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी देशभरातील सर्व कार्यकर्त्यांना उद्देशून भाजपाचे (BJP) प्रत्येक जिल्ह्यात सर्व सोईसुविधांनी सुसज्ज असे कार्यालय असावे, असा आग्रह धरला होता. त्याला अनुसरून कोल्हापूर जिल्ह्यातील भाजपाच्या सर्व कार्यकर्त्यांसाठी नागाळा पार्क येथे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असे कार्यालय उभारण्यात आले आहे.

Chandrakant Patil News
NCP Vs Congress : अजितदादा, खडा टाकू नका : पुण्याच्या जागेवरून काँग्रेस नेत्याने सुनावले

राज्यातील भाजपा कार्यकर्त्यांसाठीचे हे पहिले समर्पित कार्यालय आहे. संपूर्ण राज्यभरातून बैठकीसाठी कोल्हापुरात येणाऱ्या पदाधिकाऱ्यांसाठी कॉन्फरन्स हॉल, अध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांसाठीचे विशेष दालन, अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असा सायबर विभाग, ग्रंथालय अशा विविध विभागांनी सुसज्ज आहे.

Chandrakant Patil News
Narendra Modi Speech in New Parliament : नवीन संसदेतील पहिल्याच भाषणात पंतप्रधान मोदी म्हणाले, '' हे भवन आत्मनिर्भर...''

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून रविवारी या कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्ह्यातून येणाऱ्या कार्यकर्त्यांनी कार्यालय पाहून आनंद व्यक्त केला. "भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी सांगितलेला अंत्योदयचा मंत्र घेऊन, भाजपाचे कार्यकर्ते अहोरात्र सेवाकार्य करत आहेत. त्यामुळे आगामी काळात हे कार्यालय लोकसवेचे प्रमुख केंद्र ठरेल," असा विश्वास पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com