Sahakar Shiromani Result : मतमोजणीवेळी अभिजीत पाटलांची गाडी फोडली; काळे म्हणतात, ‘हे तर स्टंटबाजीचे....’

त्याच वेळी अभिजीत पाटील यांची गाडी कोणीतरी फोडली. त्यावरून वातावरण तणावपूर्ण बनले होते.
Abhijeet Patil Car
Abhijeet Patil CarSarkarnama

Pandharpur Politic's : सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक निकालाच्या कलानंतर सत्ता कोणाची येणार, हे सकाळी साडेदहालाच जवळपास स्पष्ट झाले हेाते. विद्यमान अध्यक्ष कल्याणराव काळे गटाच्या उमेदवारांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतली होती. त्यावेळी जल्लोषात कुणीतरी श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांची गाडी फोडली. त्यावर प्रतिक्रिया देताना काळे यांनी ‘हे स्टंटबाजीचे राजकारण आहे,’ असा टोला लगावला आहे. (Abhijeet Patil's car was broken during the counting of votes)

पंढरपूर (Pandharpur) तालुक्यातील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी कारखान्याच्या निवडणुकीत (Sugar Factory Election) विद्यमान अध्यक्ष कल्याणराव काळे (Kalyanrao Kale) यांना विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी यांच्या नेतृत्वाखाली आव्हान देण्यात आले होते. दोन्ही बाजूने अटीतटीची निवडणूक झाली. आरोप-प्रत्यारोप, वार-प्रतिवार झाले. त्यामुळे शेवटपर्यंत निवडणुकीत चुरस होती. निकालाची दिवशीही ती दिसून आली.

Abhijeet Patil Car
Sahakar Shiromani Result : विजयानंतर कल्याणराव काळेंचा अभिजीत पाटलांवर हल्लाबोल; ‘विरोधकांची गुर्मी उतरवली...’

कारखान्यासाठी अटीतटीने ९३ टक्के मतदान झाले होते. दोन्ही बाजूला विजयाचा विश्वास होता. त्यामुळे दोन्ही गटाचे प्रमुख नेते मतमोजणी केंद्राच्या परिसरात आले होते. त्यात अभिजीत पाटील हे सुद्धा होते. निवडणूक निकालाच्या पहिल्या फेरीपासूनच काळे गटाने आघाडी घेतली होती. पहिल्या दोन तासांतच काळे गटाची आघाडी ही जवळपास १००० च्या आसपास गेली होती. त्यामुळे काळे गटाच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोषाला सुरुवात झाली.

Abhijeet Patil Car
Shinde Group Entry in Legislative Council : मनीषा कायंदे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे शिंदे गटाची होणार विधान परिषदेत एन्ट्री

त्याच वेळी अभिजीत पाटील यांची गाडी कोणीतरी फोडली. त्यावरून वातावरण तणावपूर्ण बनले होते. खुद्द अभिजीत पाटील यांनी पोलिसांशी चर्चा करून घटनेची माहिती दिली, त्यामुळे निवडणुकीच्या निकालाला मात्र गालबोट लागले गेले आहे.

Abhijeet Patil Car
BJP MLA In Trouble : निवडणूक खर्चावरून भाजपचे दोन आमदार अडचणीत; मोदींची सभा ठरणार कारणीभूत, सहा वर्षे अपात्र ठरण्याचा धोका

अभिजीत पाटील यांच्या गाडीची काच फोडल्याच्या घटनेबाबत कल्याणराव काळे म्हणाले की, आमच्या कार्यकर्त्यांनी काच फोडली, असे म्हणता येणार नाही. विरोधकांकडून काही ठिकाणी आर्थिक उलाढाल जास्त झाली आहे. त्यामुळे त्यांचे हिशेब जुळत नाहीत. त्यातूनही हे घडले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आमच्या लोकांनी काच फोडली, असं म्हणता येणार नाही. कारण हे स्टंटबाजीचे राजकारण आहे.

Abhijeet Patil Car
Sahakar Shiromani Result : अभिजीत पाटलांना मोठा धक्का; कल्याणराव काळे गटाचे उमेदवार सरासरी १७०० मतांनी आघाडीवर

काळे, भालके, पाटील यांच्या एकजुटीचा परिणाम आगा सर्वच निवडणुकीत दिसून येईल. आम्ही सर्वजण विठ्ठल परिवारातून आगामी लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीत एकत्र राहून काय परिणाम होऊ शकतो, हे दाखवून देऊ, असेही काळे यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com