Abhijit Bichukale News : सातारा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात अभिजित बिचुकलेंनीही मारली उडी!

Satara Lok Sabha Constituency : '...म्हणून मी लोकसभा निवडणूक लढवणार आहे', असं म्हणत बिचुकलेंनी सांगितलं कारण.
Abhijit Bichukale News : सातारा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात अभिजित बिचुकलेंनीही मारली उडी!
sarkarnama
Published on
Updated on

Satara loksabha Election News 2024 News : सातारा लोकसभा मतदारसंघात महायुती, महाविकास आघाडीकडून अद्याप उमेदवार निश्चित झालेला नाही. इच्छुकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून राष्ट्रवादी, शिवसेना व भाजपमध्ये या मतदारसंघात रस्सीखेच सुरु आहे. अशातच बिग बॉस फेम डॉ. अभिजित बिचुकले यांनीही सातारा लोकसभेच्या रिंगणात उतरण्याचा निर्धार केला आहे.

देशाचे संविधान वाचविण्यासाठी आपण ही लोकसभेची निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे सातारा शहरातून या मतदारसंघात आणखी एका उमेदवाराची भर पडली आहे.

सातारा लोकसभेसाठी महायुती व महाविकास आघाडीचे कोण उमेदवार असणार याची उत्सुकता ताणली आहे. महायुतीकडून उदयनराजे भोसले(Udayanraje Bhosale ) यांना उमेदवारी देण्याचा शब्द केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी दिला आहे. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून नितीन पाटील इच्छुक आहेत. तर दुसरीकडे शिंदे गट शिवसेनेचे जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनीही तयारी केली आहे.अशातच भाजपकडून नरेंद्र पाटील हेही मैदानात उतरणार असे सांगत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Abhijit Bichukale News : सातारा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात अभिजित बिचुकलेंनीही मारली उडी!
Loksabha News 2024 : माढा, साताऱ्यात उमेदवार फडणवीसांचा, मात्र 'डाव' अजित पवार टाकणार?

तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षांकडून श्रीनिवास पाटील, बाळासाहेब पाटील यांची नावे पुढे आहेत. यामुळे साताऱ्यातील निवडणुकीत रंगत भरायला सुरवात झाली आहे. पण, कोणाच्याही उमेदवारीची घोषणा झालेली नाही. केवळ दावेबाजीमुळे जागा वाटप व उमेदवारांची घोषणा रखडली आहे.

अशातच साताऱ्यातील कवीमनाचे नेते डॉ.अभिजित बिचुकले(Abhijit Bichukale) यांनी सातारा लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची तयारी केली आहे.अभिजित बिचुकले यांना नुकतीच डॉक्टरेट पदवी मिळाली आहे.

याबाबत डॉ. अभिजित बिचुकले म्हणाले, 'सध्या देशाचे संविधान धोक्यात आले आहे. सर्वसामान्यांना जगण्याचा हक्क देणारे संविधान बदलण्याचा घाट काही पक्षांनी घेतली आहे. हे संविधान वाचविण्यासाठी व सर्वसामान्यांचा हक्क अबाधित ठेवण्यासाठी आपण लोकसभेची निवडणूक लढणार आहोत.'

तसेच 'एकाधिकारशाहीकडे जाणारी देशाची वाटचाल थांबवण्यासाठी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान वाचविण्यासाठी मी सातारा लोकसभेची निवडणूक लढत आहे. मी यापूर्वी 2004, 2009, 2014 आणि 2019 अशा चारवेळा सातारा लोकसभेची निवडणूक लढली व माझे अस्तित्व दाखवून दिले. सातारच्या जनतेने 2009 मध्ये मला 12 हजार 662 मतदान दिले होते. आता याची संख्या विजयाच्या मतांमध्ये झाली पाहिजे, असे मला वाटते.' असंही बिचुकले म्हणाले आहेत.

Abhijit Bichukale News : सातारा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात अभिजित बिचुकलेंनीही मारली उडी!
Loksabha election 2024 : साताऱ्याच्या जागेवरून अजित पवार अमित शाह यांना 'शह' देणार?

याशिवाय 'त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे वैचारिक वारसदार म्हणून आम्ही लोकशाही वाचविण्यासाठी पुढे जात आहोत. विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान हे टिकविले पाहिजे. संपूर्ण समाज विविध जातीधर्मच या देशाला एकसंघ ठेऊ शकतात. त्यासाठी निपक्षपातीपणे वाटचाल करताना मी सातारा लोकसभेसाठी माझी उमेदवारी जाहीर करत आहे.' असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

सातारा लोकसभेसाठी दिग्गज मंडळी निवडणुकीच्या रिंगणात असणार आहे. त्यांच्या विरोधात कवीमनाचे नेते व डॉ. अभिजित बिचुकले हे संविधान वाचविण्यासाठी रिंगणात असणार आहेत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com