अहमदनगर : अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीत 11 कोविड रुग्णांचा मृत्यू झाला होता. घटनास्थळाला केंद्रातील व राज्यातील विविध मंत्र्यांनी भेटी दिल्या. विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने अहमदनगरमधील घटना व एसटी महामंडळ कर्मचारी संप या विषयांवर महाविकास आघाडीतील नेत्यांना घेरण्याची तयारी सुरू केली आहे. Action against six persons including District Surgeon in Ahmednagar accident case
अहमदनगर येथील अपघात प्रकरणी भाजप व महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकमेकांवर आरोप केले होते. ही आग कशामुळे लागली, त्यात कोण दोषी आहे हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. या घटनेच्या चौकशीसाठी राज्य सरकारने विभागीय आयुक्तांच्या नेतृत्त्वाखाली एक समिती तयार केली आहे. या समितीला सात दिवसांच्या आत अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत.
अहमदनगर जिल्हा प्रशासनाने जिल्हा शल्यचिकित्सकांसह काही जणांवर योग्यती कारवाईचा प्रस्ताव राज्याच्या आरोग्य विभागाकडे पाठविला होता. त्यानुसार राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी काल ( सोमवारी ) जिल्हा चिकित्सकांसह सहा जणांवर कारवाई केली. या संदर्भातील माहिती मंत्री टोपे यांनी ट्विट करून दिली आहे. यात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश ढाकणे, डॉ. विशाखा शिंदे, स्टाफ नर्स सपना पठारे यांना निलंबित करण्यात आले तर आस्मा शेख व चन्ना आनंत या स्टाफ नर्स यांची सेवा समाप्ती करण्यात आली आहे.
दरम्यान, नाशिकचे विभागीय आयुक्तांची समिती उद्या ( बुधवारी ) अहमदनगर जिल्हा रुग्णालयात तपासासाठी येणार आहे. जिल्हा रुग्णालयातील कोविड विभागाच्या अतिदक्षता विभागाला पोलिस प्रशासनाने सील केले आहे.
जिल्हा नियोजन समितीच्या कालच्या बैठकीतही सदस्यांनी जिल्हा रुग्णालयातील घटनेवर पालकमंत्र्यांकडे विचारणा केली होती. जिल्हा रुग्णालयातील कोविड अतिदक्षता विभागासाठी जिल्हा नियोजन समितीने अडीच कोटी रुपयांचा निधी मंजूर केली आहे.
गुन्ह्याचा तपास मिटकेंकडे
जिल्हा रुग्णालयातील घटनेसंदर्भात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा स्वतंत्र तपास करण्याचे आदेश श्रीरामपूर विभागाचे प्रमुख पोलिस निरीक्षक संदीप मिटके यांना देण्यात आले आहेत. मिटके यांच्याकडे अहमदनगर शहराचा प्रभारी कार्यभारही आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.