सरपंचांचे धाबे दणाणले ; अपात्रतेची कारवाई टाळण्यासाठी धावपळ

कोरोना लसीकरण कमी होईल, अशा गावातील सरपंचांना (sarpanch) जबाबदार धरून त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई केली जाईल, असा इशारा दिलीप स्वामी (ceo Dilip Swamy) यांनी दिला आहे.
Vaccination
Vaccinationsarkarnama
Published on
Updated on

सोलापूर : राज्यात कोरोना रूग्णांची संख्या आटोक्यात येत आहे. ज्या गावात कोरोनाचे लसीकरण कमी झाले आहे, तेथे लसीकरणाची मोहीमेला गती देण्यात येत आहे. राज्य सरकारनं कोरोनाचे नियम शिथिल करताना लसीकरणावर जोर दिला आहे. सोलापुरात दिवाळीनिमित्त बाजारपेठांमध्ये गर्दी वाढू लागली आहे. गर्दीतूनच कोरोना वाढेल आणि तिसरी लाट येईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. नागरिकांनी गर्दी जाऊ नये, मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. शुक्रवारी शहरात दोन तर ग्रामीणमध्ये 35 रुग्ण आढळले आहेत.

सोलापूर जिल्ह्यात (Solapur Vaccination)आत्तापर्यंत 64% लसीकरण पूर्ण झाले आहे यामध्ये जिल्ह्यातील 77 ग्रामपंचायतींचे 100% लसीकरण झालेले आहे अन्य गावांमध्ये मात्र लसीकरणाचा वेग फारच कमी आहे. ज्या गावात कोरोना लसीकरण कमी होईल, अशा गावातील सरपंचांना (sarpanch) जबाबदार धरून त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई केली जाईल, असा इशारा सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी (ceo Dilip Swamy) यांनी दिला आहे. सोलापूर जिल्हात ज्या गावातील लसीकरण कमी होईल, त्या गावाचे सरपंचपद धोक्यात येणार आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी इशारा दिल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील सरपंचांचे धाबे दणाणले आहेत. स्वामी यांनी पंढरपुरात येऊन लसीकरणाचा आढावा घेतला. याबाबत सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे तसा स्वामी यांनी प्रस्ताव देखील पाठवला आहे.

Vaccination
क्रांती रेडकरची मुख्यमंत्र्यांना भावनिक साद ; आज बाळासाहेब असते तर..

सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी म्हणाले, ''लसीकरण वाढवावे यासाठी जिल्हा परिषदेकडून प्रत्येक गावांमध्ये दिवाळीपूर्वी तीन दिवसांचा मेगा लसीकरण कॅम्प घेण्यात येणार आहे. यामध्ये ज्या ग्रामपंचायतींचा सहभाग कमी असेल किंवा लसीकरण अत्यंत कमी होईल, अशा ग्रामपंचायतींच्या सरपंचांना जबाबदार धरून त्यांच्यावर साथरोग नियंत्रण कायद्यांतर्गत अपात्रतेची कारवाई केली जाईल.''

जिल्ह्यातील 18 वर्षांवरील 35 लाख व्यक्‍तींचे लसीकरण होणे अपेक्षित आहे. आतापर्यंत शहरातील सहा लाख 40 हजार 503 पैकी चार लाख 56 हजार 468 जणांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. तर ग्रामीणमधील 29 लाखांपैकी साडेसतरा लाख व्यक्‍तींनी लस टोचून घेतली आहे. कोविशिल्ड लस घेतल्यानंतर 84 दिवसांनी दुसरा तर कोवॅक्‍सिन लस घेतलेल्यांनी 28 दिवसांत दुसरा डोस घ्यायला हवा. पहिला डोस घेतलेल्यांपैकी 40 टक्‍के व्यक्‍तींनी दुसरा डोस घेतलेला नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

satara Dcc Bank Metting
Ranjitsinh shinde-Babasaheb Patil-Abhijeet Patil
Bribe Case
Crime News
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com