‘बारामती ॲग्रो’ला आदिनाथ भाडेत्त्वावर देण्यास कोर्टात आव्हान; रोहित पवारांनी केली भूमिका स्पष्ट!

आदिनाथ साखर कारखाना ‘बारामती अॅग्रो’च या वर्षीपासून चालू करणार : सुभाष गुळवे
Adinath Sugar factory-rohit pawar
Adinath Sugar factory-rohit pawarSarkarnama

करमाळा (जि सोलापूर) : करमाळा (karmala) तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना (Adinath Sugar Factory) ‘बारामती अॅग्रो’ला (Baramati Agro) भाडेतत्त्वावर देण्याच्या निर्णयास विद्यमान अध्यक्षांकडून डीआरटी न्यायालयात आव्हान देण्यात आलेले आहे, त्यामुळे कारखान्याबाबत तालुक्यात पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, व्यक्तीगत स्वार्थासाठी कोणी कितीही अडथळे आणले आदिनाथ कारखाना ‘बारामती ॲग्रो’च सुरू करणार आहे, असे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी स्पष्ट केले. (Adinath Sugar Factory to be started by Baramati Agro : Subhash Gulve)

याबाबत ‘बारामती अॅग्रो’चे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांनी सांगितले की, आमदार रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आदिनाथ कारखाना या वर्षी चालू करण्याची तयारी सुरू असताना काही मंडळी जाणीवपूर्वक यात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. करमाळा तालुक्यातील उसाचा प्रश्न लक्षात घेता हा कारखाना सुरू करण्यात आडकाठी न आणता सहकार्य करण्यासाठी परमेश्वराने या लोकांना सद्‌बुद्धी द्यावी, असे साकडेही त्यांनी देवाला घातले.

Adinath Sugar factory-rohit pawar
अजित पवारांनी केंद्र सरकारला ठणकावले; आता पुन्हा या ना त्या कारणाने दर वाढवू नका!

सध्या आदिनाथ कारखान्यावर बागल गटाची सत्ता असून रश्मी बागल यांच्या नेतृत्वाखालील कामकाज सुरू आहे. दोन वर्षांपूर्वी हा कारखाना अर्थिक अडचणीत आल्याने भाडेतत्त्वावर देण्याची प्रक्रिया झाली. मात्र, अद्यापही कारखाना सुरू झालेला नाही. कारखाना भाडेतत्त्वावर देताना बागल-पवार यांच्यात सलोख्याचे संबंध होते. आज त्या संबंधात कटूता असल्याचे जाणवत आहे.

Adinath Sugar factory-rohit pawar
भाजपला मोठा धक्का; अमित शहांच्या दौऱ्याआधी खासदार ठोकणार पक्षाला रामराम

याबाबत सुभाष गुळवे यांनी ‘बारामती अॅग्रो’ची भूमिका स्पष्ट केली. गुळवे यांनी सांगितले की, आदिनाथ कारखाना आर्थिकदृष्ट्या अडचणीत आल्यामुळे तो भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय घेतला. दोन वर्षापूर्वी कारखाना भाडेतत्त्वावर देण्यासाठी रितसर निविदा काढण्यात आली होती. त्यावेळी ‘बारामती अॅग्रो’ने कारखाना भाडेतत्त्वावर घेण्यासाठी निविदा भरली. सर्वात जास्त रकमेची निविदा आल्यामुळे शिखर बँकेकडून हा कारखाना ‘बारामती अॅग्रो’ला भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय घेण्यात आला. ‘बारामती अॅग्रो’ सर्व तांत्रिक बाबी पूर्ण करत असताना काही मंडळींनी ‘बारामती अॅग्रो’ला अंधारात ठेवून एनसीडीसीच्या प्रकरणाबद्दल कुठलीही माहिती दिली नाही. त्यामुळे हा कारखाना सुरू करण्यासाठी तांत्रिकदृष्टया अडचणी आल्या. त्यामुळे गेल्यावर्षी हा कारखाना सुरू करता आला नाही.

Adinath Sugar factory-rohit pawar
पवार, राऊत आणि संभाजीराजे दिल्लीत नियमित भेटत होते.... तेव्हाच ठरवले जात होते..

यावर्षी बारामती ॲग्रो कारखाना सुरू करण्याच्या तयारीत असताना काही लोक पुणे येथील डीआरटी न्यायालयात गेले आहेत. त्यांनी या प्रक्रियेला आवाहन दिलेले आहे. या आव्हानाला ३१ मे पर्यंत मुदत दिली आहे. ता. ३१ मेपर्यंत त्यांना आपले म्हणणे मांडण्याची मुदत दिली आहे. ‘बारामती ॲग्रो’ने शिखर बॅकेशी व ॲग्रोचे अर्थतज्ज्ञ व कायदेशीर तज्ज्ञांशी सल्लामसलत केली आहे. ‘बारामती ॲग्रो’ला हा कारखाना घेण्यासाठी कोणी डवू शकणार नाही. जाणीवपूर्वक स्वार्थासाठी या लोकांनी आडमुठेपणाची भूमिका घेतली आहे.

करमाळा तालुक्यात गेल्यावर्षीपेक्षा यंदा उसाचे उत्पादन जास्त आहे. त्यासाठी हा कारखाना सुरू होणे अत्यंत गरजेचे आहे. चार ते पाच दिवसांत बारामती ॲग्रो कारखान्याच्या दुरूस्तीचे काम सुरू करण्यात येणार होते, तोच हा प्रकारचा घडला आहे. जर या लोकांच्या आडमुठेपणाच्या भूमिकेमुळे कारखाना सुरू झाला नाही तर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी या लोकांना माफ करणार नाहीत.

Adinath Sugar factory-rohit pawar
उद्धव ठाकरे आणि संभाजीराजे समेट : शिवसेना पुरस्कृत म्हणून राज्यसभेत जाणार

अतिरिक्त ऊसाचा प्रश्न निर्माण होणार आहे. चालू हंगामात शेतकऱ्यांचे ऊस घालवण्यासाठी मोठे हाल झाले. मध्यंतरी आदिनाथ बचाव समितीच्या माध्यमातूनही या प्रक्रियेला आडकाठी आणण्याचा प्रयत्न झाला. जे कोणी आदिनाथ कारखाना सुरू करण्यासाठी अडचणी निर्माण करत आहेत, त्यांनी शेतकऱ्यांच्या उसाचा प्रश्न लक्षात घेता हा कारखाना सुरू होण्यासाठी न्यायालयात दाखल केलेला दावा मागे घ्यावी आणि शेतकरीहितासाठी सहकार्याची भूमिका ठेवावी.

कितीही अडथळे आले तरी आदिनाथ ‘बारामती ॲग्रो’च सुरू करणार

व्यक्तीगत स्वार्थासाठी कोणी काहीही केले आणि आदिनाथ कारखाना ‘बारामती ॲग्रो’ला चालवण्यासाठी कितीही आडकाठी आणली तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. ‘बारामती ॲग्रो’च आदिनाथ सहकारी साखर कारखाना सुरू करणार आहे, असे आमदार रोहित पवार यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com