मोठी बातमी : ‘विनायक मेटेंच्या निधनानंतर शिंदे गटाकडून शिवसंग्राम फोडण्याचा प्रयत्न’

शिवसंग्राम संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तानाजीराव शिंदे यांचा खळबळजनक आरोप
Vinayak Mete
Vinayak MeteSarkarnama
Published on
Updated on

सोलापूर : आमदार विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाकडून शिवसंग्राम संघटना (ShivSangram) फोडण्याचा प्रयत्न झाला, असा खळबळजनक आरोप शिवसंग्राम संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तानाजीराव शिंदे (Tanaji Shinde) यांनी केला आहे. शिवसंग्रामच्या आरोपानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. (After death of Vinayak Mete, Shinde group tried to break Shiv Sangram: Tanaji Shinde)

शिवसंग्रामचे प्रदेशाध्यक्ष शिंदे हे सोलापुरात बोलत होते. त्यावेळी त्यांनी शिंदे गटावर वरील गंभीर आरोप केला. मुख्यमंत्री शिंदे गटाचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यावर शिवसंग्राम संघटनेकडून जाहीरपणे नाराजी व्यक्त करण्यात आली. शिंदे म्हणाले की, शिवसंग्राम संघटनेचे पदाधिकारी शिंदे गटात येत असल्याची खोटी माहिती उद्योग मंत्री सामंत यांनी माध्यमांना दिली. ती चुकीची होती. सामंतांची ती भूमिका न पटणारी आहे.

Vinayak Mete
राऊतांच्या इशाऱ्यानंतर अजित पवारांचे महाविकास आघाडीबाबत मोठं भाष्य

उद्योग मंत्री सामंतांसोबत बसलेल्या कार्यकर्त्यांमध्ये केवळ एकच पदाधिकारी शिवसंग्रामचा होता. बाकीचे कोणीही शिवसंग्रामचे नव्हते. मात्र, कोणतीही खतरजमा न करता त्यांनी शिवसंग्रामचे पदाधिकारी असल्याचे सांगितलं होतं. आमदार विनायक मेटे यांच्या निधनानंतर एकनाथ शिंदे यांच्या नावाने शिवसंग्राम संघटनेत कशी फूट पडेल, हा प्रयत्न मंत्री उदय सामंत यांनी केला. ही अत्यंत खेदजनक बाब आहे, अशी खंतही शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली.

Vinayak Mete
अमोल कोल्हे भाजपच्या वाटेवर आहेत का? अजितदादा म्हणाले की, 'मध्यंतरी माझं त्यांचं बोलणं झालंय...'

शिवसंग्राम संघटना ही २०१४ पासून भाजपासोबत घटक पक्ष म्हणून काम करते आहे. बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचा मंत्री शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांना फोडण्याचा प्रयत्न करत असेल तर ते मित्रधर्म पाळत नाहीत, असा आरोप करून शिवसंग्रमाचे तानाजी शिंदे म्हणाले की, अशा प्रकारचे काम सुरू राहिले तर ते योग्य नाही. मुख्यमंत्र्यांनी याची दखल घ्यावी.

Vinayak Mete
किल्लारी परिसराला पुन्हा भूकंपाचा धक्का; जमिनीखालून रेल्वे धावल्याचा भास झाला

शिवसंग्रामचे कार्यकर्ते नसतानादेखील मंत्री सामंत त्यांचा परिचय शिवसंग्रामचे कार्यकर्ते म्हणून देत आहेत. त्यांनी सांगितलेल्या महिला अध्यक्ष, युवक अध्यक्ष किंवा सोशल मीडिया प्रमुख यापैकी कोणीही त्यांच्यासोबत नव्हते. तरीही एक मंत्री कोणतीही खातरजमा न करता संपूर्ण राज्याला त्यांचा परिचय करून देत होता. या घटनेबाबत संपूर्ण मराठा समाजामध्ये शिंदे गटाबाबत तीव्र भावना उमटल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही शिंदे यांनी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com