Solapur Politic's फडणवीसांनंतर अजित पवारही सोलापूरच्या दौऱ्यावर : काँग्रेस, भाजपनंतर राष्ट्रवादीतही राजकीय घडामोडींना वेग

भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसमधील या दोन दिग्गज नेत्यांच्या सोलापूर दौऱ्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे
Ajit Pawar-Devendra Fadnavis
Ajit Pawar-Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Solapur : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या आठवड्यात सोलापूर शहराचा दौरा केला. त्यानंतर आता विरोधी पक्षनेते अजित पवार हे येत्या गुरुवारी (ता. १ जून) सोलापूर शहर व जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसमधील या दोन दिग्गज नेत्यांच्या सोलापूर दौऱ्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. कर्नाटक निवडणूक निकालानंतर लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या घडामोडी घडत आहेत. त्या पार्श्वभूमीवर हे दौरे कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविणारे ठरत आहेत. (After Devendra Fadnavis, Ajit Pawar will also visit Solapur)

मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोलापुरचा मुक्कामी दौरा केला होता. या दौऱ्यात त्यांनी पंढरपूर, सांगोला व सोलापूर शहरातील कार्यक्रमांना हजेरी लावून जिल्ह्यातील राष्ट्रवादीत उत्साह निर्माण केला हेाता. त्यांच्या या दौऱ्यात सोलापूर लोकसभा मतदार संघाबाबत चाचपणीही झाली होती. पवारांच्या दौऱ्यानंतर काँग्रेसने माजी मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत सोलापुरात मेळावा घेतला. या मेळाव्याने काँग्रेसची वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न झाला. पण, तो अंतर्गत रुसव्याफुगव्यांनीच जास्त गाजला.

Ajit Pawar-Devendra Fadnavis
Ramdas Athawale News : रामदास आठवले म्हणतात, ‘मी पुन्हा शिर्डीत येईन...'

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोलापू्रचा दौरा केला. बावकुळेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही सोलापुरात हजेरी लावून शासकीय कार्यक्रमांसह भाजपचा मेळावा घेतला. कामगारमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी सोलापुरात येऊन भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. सोलापूरच्या राजकारणातील प्रमुख तीन पक्षांचे वरिष्ठ नेते सोलापुरात येऊ लागल्याने कार्यकर्त्यांमध्ये निवडणूक तयारीचा उत्साह संचारू लागला आहे.

Ajit Pawar-Devendra Fadnavis
Baramati Dudh Sangh Eelection : अजित पवार सर्वेसर्वा असलेल्या बारामती दूध संघाची निवडणूक जाहीर; बिनविरोधची परंपरा कायम राहणार?

दरम्यान, माजी आमदार दिलीप माने यांचे चिरंजीव डॉ. पृथ्वीराज यांच्या विवाह सोहळ्याच्या स्वागत समारंभासाठी तसेच एका खासगी कार्यक्रमानिमित्त पवार सोलापूरच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या या दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कोणताही राजकीय कार्यक्रम नसला तरी अजितदादांना (Ajit Pawar) भेटण्यासाठी शहर आणि जिल्ह्यातील पक्षाच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यावेळी राजकीय जोडण्या आणि राजकीय संदेश दिला जाऊ शकतो.

Ajit Pawar-Devendra Fadnavis
Baramati News : पळशीच्या माजी सरपंचांची बातच न्यारी : वयाच्या ४० व्या वर्षी परीक्षा देत बारावीत पटकावला प्रथम क्रमांक

भाजपकडून माढा, सोलापुरात लोकसभेची तयारी सुरू

माढा आणि सोलापूर लोकसभा मतदार संघ पुन्हा ताब्यात ठेवण्यासाठी भाजपने ग्राऊंडवर जाऊन तयारी सुरू केली आहे. सोलापूर लोकसभा मतदार संघात प्रदेशाध्यक्ष बावनकुळे, उपमुख्यमंत्री फडणवीस, कामगारमंत्री खाडे यांनी कार्यकर्त्यांच्या व पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन येथील अंदाज घेण्यास सुरुवात केली आहे. माढा लोकसभा मतदार संघात केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांनी माढा मतदार संघातील प्रमुख तालुक्यांचा दौरा केला आहे. या दौऱ्यांमुळे भाजपचे कार्यकर्ते रिचार्ज झाले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com