रोहितच्या बहिणीनं सांगितलं पहिल्या विजयामागचं गुपित; म्हणाली, आबांची...!

कवठेमहांकाळ नगरपंचायतीत रोहित यांनी एकहाती विजय मिळवत विरोधकांना चितपट केलं आहे.
Rohit Patil with His Sisters
Rohit Patil with His SistersSarkarnama
Published on
Updated on

सांगली : सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ नगरपंचायतीवर (Nagar Panchayat Election) राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आर. आर. पाटील (R.R.Patil) यांचे पुत्र रोहित पाटील (Rohit Patil) यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसने एक हाती सत्ता मिळवली आहे. या विजयानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांसह कुटुंबीयांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. बहीण स्मिता पाटील (Smita Patil) यांनीही रोहितच्या विजयाची खात्री होती असं सांगत आरआर आबांची आठवण काढली. (Rohit Patil News Updates)

रोहितविरोधात सर्वपक्षीय आघाडी असूनही त्याने मिळवलेल्या अभूतपुर्व यशाबद्दल स्मिता पाटील म्हणाल्या, आबांची वकृत्वशैली, सर्वसामान्य जनतेतील वावर, नेतृत्व घडण्यासाठी आवश्यक गोष्टी आबांच्या माध्यमातून आत्मसात करण्याचा प्रयत्न त्याने केला आहे. नक्कीच त्याचा फायदा होईल. त्यापध्दतीने रोहित काम करेल. तसं काम करण्यास त्याने सुरूवात केली आहे. त्यामुळे रोहितच्या पाठिशी जनता उभी राहिली.

Rohit Patil with His Sisters
सेनापतीला दाखवून द्यायचं होतं की मावळ्यांनी गड राखलेला आहे...

आम्हाला विजयाची खात्री होती. सर्वसामान्य जनता नेहमीच आमच्या पाठिशी उभी राहिली आहे. याही निवडणुकीत ते आमच्या पाठिशी राहतील, यात आम्हाला कुठलीच शंका नव्हती. रोहितची ही पहिलीच लढत होती. त्याचं वयही अतिशय कमी आहे. पण रोहितचं काम अतिशय चांगलं होतं. कोरोना काळात त्याने तासगांव, कवठेमहांकळमध्ये त्याने खूप काम केलं आहे. लोकांचे प्रश्न विधानसभेत वहिनींच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करतो. ज्येष्ठ नेत्यांना भेटून, त्यांचे मार्गदर्शन घेत तो कामे करण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यामुळे आम्हाला त्याच्या विजयाची खात्री होती, असं सांगत स्मिता पाटील यांनी भावाचं तोंडभरून कौतुक केलं.

दरम्यान, कवठे महांकाळ निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला १० जागा आणि माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्या शेतकरी विकास आघाडी ६ आणि एका जागेवर अपक्ष निवडून आले आहेत. खासदार संजयकाका पाटील (Sanjaykaka Patil) यांनी जोर लावूनही इथे भाजपला एकही जागा जिंकता आली नाही. या निकालामुळे रोहित पाटील यांनी जिल्ह्याच्या राजकारणात जोरदार एन्ट्री केली आहे. तसेच "निवडणुकीनंतर माझा बाप आठवेल" असा त्यांनी प्रचारादरम्यान दिलेला शब्द खरा केला आहे. निवडणूक काळात आई आमदार सुमन पाटील तंदुरुस्त नसल्याने प्रचाराची सर्व जबाबदारी रोहित यांच्या खांद्यावर होती. तसेच निवडणुकीत सर्वजण विरुद्ध रोहित पाटील अशी स्थिती होती. मात्र या आव्हानानंतरही त्यांनी एकहाती मैदान मारले आहे.

या निकालावर प्रतिक्रिया देताना रोहित पाटील म्हणाले, प्रचारावेळी विरोधकांनी वडील हा शब्दप्रयोग करण्याऐवजी बाप शब्द वापरला. त्यांचाच धागा पकडून मी विरोधकांना "निवडणुकीनंतर बाप आठवल्याशिवाय राहणार नाही असं म्हटलं होतं. मला आज आबांची आठवण येतं आहे. कवठे महांकाळ नगरपंचायतीत एकहाती सत्ता मिळवण्याचं त्यांचं स्वप्न होतं. आज राष्ट्रवादीला बहुमत मिळालं, आबांचं स्वप्न पूर्ण झालं. सेनापतीला दाखवून द्यायचं होतं की मावळ्यांनी गड राखलेला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com