Legislative Council Election : विखे, थोरातांची कोंडी करणार; ताबेंच्या विरोधात मैदानात : अलिखित करार मोडणार?

Legislative Council Election : नाशिक पदवीधरमध्ये विखे विरुद्ध थोरात सामना होण्याची शक्यता
 Balasaheb Thorat, Dr. Sudhir Tambe, Radhakrishna Vikhe Patil
Balasaheb Thorat, Dr. Sudhir Tambe, Radhakrishna Vikhe PatilSarkarnama
Published on
Updated on

Legislative Council Election : नाशिक पदवीधर मतदार संघ एकेकाळी भाजपचा बालेकिल्ला समजला जात होता. परंतु २००९ पासून कॉंग्रेसचे (Congress) सुधीर तांबे यांनी सलग तीन वेळा भाजप (BJP) उमेदवाराला या मतदार संघात धूळ चारून वर्चस्व निर्माण केले आहे. यावेळी त्यांना रोखण्यासाठी भाजपतर्फे राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे लहान बंधू डॉ. राजेंद्र विखे पाटील (Rajendra Vikhe Patil) यांचे आव्हान उभे करण्याची चर्चा भारतीय जनता पक्षाच्या गोटातून व्यक्त होत आहे.

यामुळे माजी मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आणि राधाकृष्ण विखे पाटील यांचा सामना होणार असल्याची चर्चा आहे. तसेच थोरात आणि विखे हे काँग्रेसमध्ये असताना दोन्ही मातंबर नेत्यांमध्ये एक अलिखित करार होता, अशी चर्चा राजकीय वर्तुळात असते. त्यामध्ये आप-आपले मतदार संघ बघायचे आणि एक-दुसऱ्याच्या मतदार संघात लक्ष घालायचे नाही, असे त्यांचे ठरलेले होते, असे राजकीय जाणकार सांगतात.

मात्र, नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत विखे पाटील यांनी थोरात यांच्या संगमनेर मतदार संघात ग्रामपंचायत निवडणुकीत विखे यांनी पॅनल उभे केले होते. तर थोरातांच्या गावातील ग्रामपंचायत विखे यांनी खेचून आणली. त्यामुळे विखे भाजपमध्ये गेल्यानंतर हा अलिखित करार, मोडला असल्याचे बोलले जात आहे.

 Balasaheb Thorat, Dr. Sudhir Tambe, Radhakrishna Vikhe Patil
Legislative Council Election : बच्चू कडूंनी वाढवले शिंदे-फडणवीसांचे टेन्शन; घेतला मोठा निर्णय

डॉ. राजेद्र विखे पाटील हे राजकारणात नाहीत. मात्र, ते प्रवरा अभिमत विद्यापीठाने कुलपती तथा प्रवरा मेडीकल ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. त्यांना उमेदवारी मिळाल्यास ही निवडणूक नगर जिल्हा केंद्रीत होवून कॉंगेसचे बाळासाहेब थोरात विरूध्द राधाकृष्ण विखे पाटील अशी लढत होईल. कारण डॉ. सुधीर तांबे हे बाळासाहेब थोरात याचे मेव्हणे आहेत.

डॉ. सुधीर तांबे (Dr. Sudhir Tambe) यांचा या मतदार संघात दांडगा संपर्क आहे. हा मतदार संघ भाजपचा बालेकिल्ला होता. नाशिक येथील ना. स. फरांदे व धुळे येथील प्रतापदादा सोनवणे यांना भाजपतर्फे या मतदार संघाचे प्रतिधीत्व केले आहे. प्रतापदादा सोनवणे हे खासदार झाल्यामुळे सन २००९ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत डॉ. सुधीर तांबे यांनी कॉंग्रेस बंडखोर म्हणून निवडणूक लढविली आणि त्यांनी भाजपचे डॉ. प्रसाद हिरे, कॉंग्रेसचे अधिकृत डॉ. नितीन ठाकरे यांचा पराभव केला.

त्यानंतर सन २०१० मध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांना कॉंग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून उमेदवारी मिळाली. त्यांनी भाजपचे डॉ. सुहास फरांदे याचा तब्बल ३५ हजार मतांनी पराभव केला. तर २०१७ मध्ये त्यांनी भाजपचे उमेदवार प्रशांत पाटील यांचा तब्बल ४५ हजार मतानी पराभव करून हॅटट्रीक साधली होती. डॉ तांबे यांचा मतदार संघात संपर्क चांगला आहे. या शिवाय त्यांची कार्यकर्त्यांची फळीही आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात उमेदवार उभे करण्याचे भाजपसमोर मोठे आव्हान आहे.

भारतीय जनता पक्षाने यावेळी कॉंग्रसकडून हा मतदार संघ पुन्हा आपल्याकडे घेण्यासाठी कंबर कसल्याचे सांगण्या येत आहे. यावेळी तांबे यांच्यासमोर नगरमधूनच तगडे आव्हान उभे करण्याची खेळी करण्यात येणार आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांचे लहान बंधून डॉ. राजेंद्र विखे पाटील यांना उमेदवारी देण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा भाजपच्या गोटात आहे.

 Balasaheb Thorat, Dr. Sudhir Tambe, Radhakrishna Vikhe Patil
गडकरी, फडणवीस अन् बावनकुळेंच्या गडात भाजपला उमेदवार मिळेना? अन् गाणारांच्या नावावर एकमत होईना!

पक्षाचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) नगर दौऱ्यावर असताना त्यांची चर्चाही झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यावेळी डॉ. राजेंद्र विखे पाटील यांनी उमेदवारीबाबत चर्चा नसल्याचे सांगितले होते. मात्र, भाजपकडून त्यांनाच संधी देण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. भाजपच्या एका नेत्यांनी सांगितले, कि गेल्या तीन निवडणुकीत या मतदार संघात भाजपचा उमेदवार नगर जिल्ह्यात मागे पडत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे यावेळी तांबे यांच्यासमोर नगरमधूनच आव्हाण उभे करण्याची भाजपची तयारी आहे.

दरम्यान, भारती जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तीन उमेदवारांची घोषणा केली. यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत उपस्थित होते. त्यामध्ये कोकण शिक्षक मतदार संघातून भाजपने ज्ञानेश्वर म्हात्रे यांना उमेदवारी दिली आहे. अमरावतीसाठी पदवीधर मतदार संघातून रणजीत पाटील यांना तर मराठवाडा शिक्षक मतदार संघातून किरण पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, भाजपने नागपूर आणि नाशिकसाठी उमेदवारांची घोषणा केली नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com