Dattatray Bharane : कृषिमंत्री भरणेंनी जिल्हाधिकाऱ्यांना सुनावले; ‘तुम्ही मदत का करत नाही, टेबलावर बसून काम करू नका’

Solapur Collector News : माढा तालुक्यात पूरग्रस्तांनी चाऱ्याच्या टंचाईची तक्रार मांडल्यावर कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना फोनवर सुनावले. पूरग्रस्तांना मदत न मिळाल्याने शेतकरी संतप्त झाले.
Dattatray Bharane
Dattatray BharaneSarkarnama
Published on
Updated on
  1. अतिवृष्टी आणि महापुरामुळे जनावरांना चाऱ्याची टंचाई निर्माण झाल्याने माढा तालुक्यातील शेतकऱ्यांनी कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्यासमोर संताप व्यक्त केला.

  2. भरणेंनी तात्काळ सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना फोन करून मदत न पोहोचल्याबद्दल जाब विचारला आणि “टेबलावर बसून काम करू नका” असे सुनावले.

  3. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत देण्याची हमी देत भरणेंनी चारा आणि जेवणाची तात्काळ व्यवस्था करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या.

Madha, 27 September : अतिवृष्टीमुळे आलेला महापूर आणि त्यामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे आज (ता. 27 सप्टेंबर) माढा तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते. पूरग्रस्तांनी कृषिमंत्र्यांच्या पुढे जनावरांना चाऱ्याचा प्रश्न गंभीर असल्याचे गाऱ्हाणे मांडले. या दौऱ्यात प्रशासकीय अधिकारी उपस्थित नव्हते, त्यामुळे मंत्री भरणेंनी थेट जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना फोन लावून ‘सीएम, डीसीएमंनी मदत जाहीर केली होती. तुम्ही लोकांना मदत का करत नाहीत. तुम्ही टेबलावर बसून काम करू नका’ अशा शब्दांत सुनावले.

माढा तालुक्यातील उंदरगाव येथे पाहणी करताना शेतकऱ्यांनी जनावरांच्या चाऱ्याचा मुद्दा मांडला. महापुरामुळे सर्व चारा वाहून गेला आहे, सर्वत्र गाळ साचलेला आहे, अशा वेळी जनावरांना काय टाकायचं असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या संतापाचा कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे (Dattatray Bharane) यांना सामना करावा लागला.

शेतकऱ्यांचा संताप पाहून कृषिमंत्री भरणे यांनी थेट सोलापूरचे जिल्हाधिकारी (Solapur Collector) कुमार आशीर्वाद यांना फोन लावला. कलेक्टरसाहेब, मी उंदरगाव येथे आलेा आहे. या लोकांना सीएम डीसएमनी जाहीर केलेली मदत अजून कशी मिळालेली नाही हो. तुम्ही का मदत करत नाही हो. अजून मदत का पोचलेली नाही. येथील लोकांचा उद्रेक भरपूर आहे.

नाही नाही, आता तुम्ही टेबलावर बसून काम करू नका, असे कृषिमंत्री भरणे यांना सुनावले. ते म्हणाले, आता तुमचे प्रांत मॅडम नाहीत, तहसीलदार नाहीत कुठे गेले. ठीक आहे, त्या असतील फिल्डिवर. आता काय अडचणच आहे. या ठिकाणी चाऱ्याचा आणि जेवणाचा विषय आहे. उद्या पूरग्रस्तांच्या जनावरांना चार मिळेल, अशी व्यवस्था करा.

Dattatray Bharane
Ajit Pawar : ‘आम्हाला खाज होती; म्हणून ‘माळेगाव’चा चेअरमन झालो, आता ‘सोमेश्वर’चाही होणार’ : अजितदादांच्या गुगलीने अनेकांची उडाली झोप

पूरग्रस्तांची जेवणाची व्यवस्था बऱ्यापैकी झालेली आहे. फक्त चाऱ्याचा विषय तेवढा इथला मिटवा. साखर कारखान्यांनी व इतर सर्वांनी मदत केली आहे. तुम्ही प्रशासनाने चाऱ्याची व्यवस्था करावी, अशी सूचना मंत्री भरणेंनी केली.

माध्यमांशी बोलत असतानाच कृषिमंत्री भरणे यांनी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना झापले. तसेच, पूरग्रस्तांसाठी करावयच्या उपाय योजना याबाबतही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केल्या.

येत्या दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत देणार असल्याची माहितीही कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी दिली. ते म्हणाले, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीला मदत मिळवण्यासाठीच गेले होते. येत्या मंगळवारच्या कॅबिनेट बैठकीत मदतीबाबत चर्चा होऊन ठोस निर्णय घेण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांचा संताप आणि उद्विग्नता, आक्रोश हा स्वाभाविकच आहे. आम्ही शेतकऱ्यांचीच पोरं आहोत. कारण अतिवृष्टीमुळे शेतकरी आणि सर्वसामान्या जनतेचे मोठे नुकसान झाले आहे.

Dattatray Bharane
Sadabhau Khot : आठ दिवस कुठं होता? नुसते फोटो काढायला आलात का?; माढ्यातील शेतकऱ्यांचा रोष पाहून हात जोडत सदाभाऊंचा काढता पाय
  1. प्र: शेतकऱ्यांनी कोणती मुख्य समस्या मांडली?
    उ: जनावरांच्या चाऱ्याची तीव्र टंचाई.

  2. प्र: कृषिमंत्र्यांनी कोणाला फोन करून जाब विचारला?
    उ: सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद.

  3. प्र: मदत कधीपर्यंत देण्याचे मंत्री भरणेंनी सांगितले?
    उ: येत्या दिवाळीपूर्वी.

  4. प्र: मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीला का गेले होते?
    उ: पूरग्रस्तांसाठी केंद्राकडून आर्थिक मदत मिळवण्यासाठी.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com