कोणतीही करवाढ नसलेला नगर महापालिकेचा 817 कोटींचा अर्थसंकल्प

अहमदनगर महापालिकेत आज स्थायी समिती सभापती कुमार वाकळे यांनी महापौर रोहिणी शेंडगे ( Rohini Shendge ) यांच्याकडे 817 कोटी रुपयांचे आर्थिक अंदाजपत्रक सादर केले.
Ahmednagar Municipal Corporation's budget
Ahmednagar Municipal Corporation's budgetLahu Dalavi
Published on
Updated on

अहमदनगर - अहमदनगर महापालिकेत आज स्थायी समिती सभापती कुमार वाकळे यांनी महापौर रोहिणी शेंडगे ( Rohini Shendge ) यांच्याकडे 817 कोटी रुपयांचे आर्थिक अंदाजपत्रक सादर केले. यात करवाढीचा कोणताही प्रस्ताव नाही. त्यामुळे आगामी आर्थिक वर्षात नगरकरांवर कोणताही आर्थिक बोजा पडणार नाही. ( Ahmednagar Municipal Corporation's budget of Rs 817 crore presented without any tax increase )

महापालिका आयुक्त शंकर गोरे यांनी 11 मार्चला 802 कोटी रुपयांचे आर्थिक अंदाजपत्रक स्थायी समिती सभापती वाकळे यांच्याकडे सादर केले होते. यावर स्थायी समितीत चर्चा होऊन त्यात 15 कोटींच्या कामाची भर घालत 817 कोटी रुपयांचे आर्थिक अंदाजपत्रक वाकळे यांनी महापौर रोहिणी शेंडगे यांच्याकडे सादर केले. या प्रसंगी उपमहापौर गणेश भोसले, विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांच्यासह नगरसेवक, महापालिकेतील अधिकारी उपस्थित होते. या आर्थिक अंदाजपत्रकावर चर्चा करण्यासाठी नगरसेवकांनी महापौरांना एक दिवसाचा वेळ दिला आहे. त्यामुळे उद्या ( मंगळवारी ) सकाळी 11 वाजता महापालिकेत आर्थिक अंदाजपत्रकीय सभा होईल. त्यात या आर्थिक अंदाजपत्रकावर चर्चा होणार आहे.

Ahmednagar Municipal Corporation's budget
नगर महापालिका कर्मचाऱ्यांच्या धरणे आंदोलनाने प्रशासनासमोर वाढविला पेच

कुमार वाकळे यांनी सांगितले की, आयुक्त यांनी 802 कोटी रुपये अर्थसंकल्प स्थायी समिती समोर सादर केला. स्थायी समितीने महापालिकेडून सामान्य नागरिकांच्या गरजेनुसार सुधारणा करू अर्थसंकल्पामध्ये शिफारशी केल्या नुसार बदल करण्याची आवश्यकता असल्याने, लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न स्थायी समितीने केला आहे. त्याच प्रमाणे महापालिकेची आर्थिक परिस्थिती पहाता, उत्पन्न वाढविणे देखील गरजेचे आहे. सर्व सदस्यांचे सहकार्य असल्याने शहराचा सर्वांगीण विकास नक्कीच होणार आहे.

ते पुढे म्हणाले की, महापालिकेचे आर्थिक उत्पन्न व खर्च यांचा मेळ घालुन स्थायी समितीने 817 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार केले आहे. महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी नवीन घरांना घरपट्टी लागू करण्यात यावी. ज्या मालमत्ताधारकांच्या मालमत्तांची नोंदणी महापालिकेकडे करणे, अदयापर्यंत झालेली नाही अशा मालमत्ताधारकांना घरपट्टीची आकारणी करणे, रिव्हिजन करून घरपट्टी आकारणीचे काम करणे, मालमत्ता हस्तांतरण फी, गाळे भाडे, जाहिरात बोर्ड, अनाधिकृत बांधकाम नियमीत करणे व मालमत्ता धारकांकडून थकीत करणे, अनाधिकृत बांधकामांचा शोध घेणे, अनाधिकृत नळ कनेक्शन रेग्युलाईज करणे, बंद असलेल्या शाळा खासगीकरणाच्या माध्यमातून चांगल्या शैक्षणीक संस्थांच्या मागणी नुसार भाडेतत्वावर देणे. या सर्व कामां करीता केलेल्या कामाचा नियमीत आढावा घेवून व येणाऱ्या अडचणींचा पाठपुरावा करून महापालिकेच्या उत्पन्न वाढीवर भर देण्यात यावा, असे कुमार वाकळे यांनी सुचविले.

Ahmednagar Municipal Corporation's budget
पब्लिसीटीस्टंटला नव्हे मी शहर विकासाला महत्त्व देतो - आमदार संग्राम जगताप

शॉपिंग कॉम्प्लेक्सची मागणी

सावेडी गावठाण मधील एन.सी.सी. कार्यालयाच्या जागेत महापालिकेचे सुसज्ज असे शॉपींग कॉम्प्लेक्स बांधण्यासाठी शहर अभियंता व नगररचनाकार, मार्केट विभाग प्रमुख यांनी समन्वय साधून संयुक्तपणे अहवाल सादर करणे बाबत प्रशासनास आदेश देण्यात आलेले आहेत. पाणी पुरवठा फेज- २ योजनेतून 30 एप्रिल 2023 पर्यंत शहरातील नागरिकांना पाणी देण्याच्या प्रयत्न आहे. सावेडी, बोल्हेगांव, नागापुर या उपनगरांमधील नागरिकांचे आरोग्य विषयक सुविधा देणे करीता सावेडी येथील प्रभात बेकरी मागील 15 हजार फुट जागेमध्ये ए. आर. च्या माध्यमातून महापालिकेचे अदयावत हॉस्पीटल उभारणी होईल, असेही वाकळे यांनी सांगितले.

Ahmednagar Municipal Corporation's budget
...म्हणून थोरातांच्या कारखान्यात विखे होते चेअरमन

महापुरुषांचे पुतळे

हिंदुस्थानचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंहासनावर बसलेला ब्रांझ धातूचा 12 फुटी पुतळा तयार करून अहमदनगर महापालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारती समोरील जागेत नियोजित चबुत यावर बसविणे कामी कार्यारंभ आदेश देण्यात आलेला आहे. छत्रपती संभाजी महाराज यांचा पुर्णाकृती पुतळा सावेडी भागातील प्रोफेसर चौक येथे बसविणे, राष्ट्रपुरुष महात्मा ज्योतिबा फुले यांचा पुर्णाकृती पुतळा माळीवाडा वेशीमध्ये बसविणे, महापुरूष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा मार्केट यार्ड चौकामध्ये बसविणे, वरिल सर्व महापुरुषांचे पुतळे बसविण्यासाठी शासनाचे सर्व नियम व अटी यांची परवानगी घेवून येत्या वर्षामध्ये हे सर्व पुतळे बसविण्याचा माझा प्रयत्न राहील. तसेच भगवान गैतम बुध्द, वीर लहुजी वस्ताद, शाहीर आण्णा भाऊ साठे तसेच केडगाव येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा या सर्व पुतळ्यांचे सुशोभिकरण करण्याकरीता अर्थसंकल्पामध्ये भरीव विधीची तरतूद करण्यात आलेली आहे, असे वाकळे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com