Ahmednagar News | धक्कदायक : शाळेनेच फोडला पेपर, परिक्षेच्या एक तास आधीच 119 विद्यार्थ्यांच्या हाती गणिताची प्रश्नपत्रिका!

HSC Paper leak : निकाल १०० % लावण्यासाठी शाळेने चुकवलं 'गणित', मुख्यध्यापकांसह पाच जणांना अटक..
Ahmednagar News HSC Paper leak :
Ahmednagar News HSC Paper leak :Sarkarnama

HSC Paper leak News : बारावीच्या गणित पेपरफुटीप्रकरणी एक अत्यंत धक्कादायक माहिती उघड झाली आहे. अहमदनगरमधील एका कॉलेजच्या तब्बल ११९ विद्यार्थ्यांना पेपर सुरू होण्याच्या एक तास आगोदर गणिताची प्रश्नपत्रिका मिळाल्याची माहिती क्राईम बँचच्या तपासातून समोर आले आहे. तसेच या प्रकरणात गणिताचा पेपर कसा सोपवण्यात आला, याबाबत बोर्डाची भूमिका संशयास्पद असल्याचे गुन्हे शाखा सूत्रांनी माहिती दिली आहे.

या पेपरफुटी प्रकरणात अहमदनगर जिल्ह्यातील मातोश्री भागूबाई भामरे विद्यालयाच्या मुख्याध्यापक यांच्यासह इतर पाच जणांना अटक केली गेली आहे. मुंबई पोलीस गुन्हे विभागाकडून ही कारवाई करण्यात आली. 3 मार्च रोजी बारावी गणिताची प्रश्नपत्रिका महाविद्यालयातील तब्बल ११९ विद्यार्थांना पेपर सुरू होण्याच्या एक तास आधीच देण्यात आला.

Ahmednagar News HSC Paper leak :
Teachers Recruitment Scam : टीएमसीच्या बड्या नेत्याला ED कडून अटक

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, अहमदनगरच्या या महाविद्यालयात एकूण 337 विद्यार्थी बारावी गणिताच्या पेपर देण्यासाठी बसले होते. यापैकी, 119 विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र हे याच महाविद्यालयातच होते. आपल्या शाळेचा निकाल हा 100 टक्के लागावा, या दृष्टीने शाळेच्या व्यवस्थापनानेच पेपर फोडल्याची माहिती आहे. इतकेच नव्हे तर, परिक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका आल्यानंतर त्याचे फोटो काढून, व्हॉट्सअॅपवर पाठवून प्रत्येकी 10 हजार रुपये घेतले गेले असल्याचे तपासात पुढे आले आहे.

महाविद्यालयाच्या मालकाची भूमिका संशयास्पद :

मुंबई क्राईम ब्रँचची एक युनिट आता अहमदनगरमध्ये याचा तपास करत आहे. शिक्षण मंडळ कार्यालयातीलच काही जणांचा यात सक्रिय सहभाग असल्याचा संशय गुन्हे शाखेला वाटत आहे. याचा तपास करताना मालकाची भूमिका संशयास्पद असल्याचे काही धागेदोरे गुन्हे शाखेच्या हाती लागले आहे. महाविद्यालयाचा मालकाचा सद्या थांगपत्ता लागत नाही, त्यांचा शोध घेण्याचं काम सुरू आहे. महाविद्यालयाचा मालक सध्या बेपत्ता असून शोध सुरु आहे.

Ahmednagar News HSC Paper leak :
Teachers Recruitment Scam : टीएमसीच्या बड्या नेत्याला ED कडून अटक

विद्यार्थ्यांची चौकशी करणार :

या महाविद्यालयातील ज्या विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र दुसऱ्या ठिकाणी लागले, अशा विद्यार्थ्यांची देखील यात चौकशी होणार आहे. मात्र सद्यस्थितीत बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरु आहेत, ते विद्यार्थी अल्पवयीन आहेत. अशा स्थितीत त्यांच्या परिक्षाकाळात त्यांच्यावर ताण येऊ नये म्हणून परिक्षा संपल्यानंतरच याची सखोल चौकशी करण्यात येणार आहे, अशी माहिती क्राईम ब्रँचने दिली आहे. आणि विद्यार्थी अल्पवयीन आहे. परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांवर ताण येऊ नये यासाठी परीक्षा संपल्यानंतर चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती क्राईम ब्रान्चच्या अधिकाऱ्यांनी दिली.

शिक्षण मंडळाच्या कार्यालयातील काहींचा सहभाग :

शिक्षण मंडळातील काही जणांचा यात सहभाग असल्याचा दाट संशय क्राईम ब्रान्चने व्यक्त केला आहे. कारण बोर्डाच्या नियमांनुसार पेपर महाविद्यालयाशी संबधित शिक्षकांकडे म्हणजे रनरकडे सुपूर्त केले जात नाही. मात्र अहमदनगरमध्ये याच्या अगदी उलट घडले आहे. पेपर हा महाविद्यालयाशी संबंधित असलेल्या रनरकडे सोपवण्यात आला. रनर हा नेहमीच दुसऱ्या शाळेतील किंवा महाविद्यालयातील असायली हवा, असा नियमा आहे. या शिवाय पेपरफुटीचं संबंध राज्यातील इतर काही ठिकाणी जुळलेल्या आहेत का? आणखी इतर शाळेतील विद्यार्थ्यांना हा पेपर उपलब्ध झाला का? तसेच, बुलढाणा येथील सिंदखेड पेपरफुटीचा यामागे संबंध असेल का? याची आता चौकशी होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com