Ahmednagar Politics : कौटुंबिक आरोपांचे राजकीय भांडवल कशासाठी? ; गडाखांची माजी आमदार मुरकुटेंवर टीका!

Shankarrao Gadakh Patil : माजी आमदार बाळासाहेब मुरकुटेवर अप्रत्यक्ष निशाणा..
Ahmednagar Politics : Shankarrao gadakh : Balasaheb Murkute : Yashawantrao Gadakh
Ahmednagar Politics : Shankarrao gadakh : Balasaheb Murkute : Yashawantrao GadakhSarkarnama :

सोनई (अहमदनगर) : पन्नास वर्षाच्या राजकीय वाटचालीत कधी नव्हे ते, सध्या असलेल्या तालुक्यातील विरोधकाने राजकीय पोळी भाजण्यासाठी आमच्या कुटुंबातील दुःखद प्रसंगाचे केलेले राजकीय भांडवल दुर्दैवी आहे. संस्था उभ्या करुन लोकहिताचे कार्य करण्याऐवजी उभ्या असलेल्या संस्था पाडण्यासाठी सुरु असलेला डाव हजारोंच्या प्रपंचात माती कालविणारा आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख (Yashawantrao Gadakh) यांनी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे (Balasaheb Murkute) यांचे नाव न घेता केले. (Ahmednagar Politics)

Ahmednagar Politics : Shankarrao gadakh : Balasaheb Murkute : Yashawantrao Gadakh
Pimpri Chinchwad News : शास्ती कर माफीबद्दल मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचा पिंपरी-चिंचवडकर करणार नागरी सत्कार!

नेवासे तालुका दुध संघातील दहा वर्षापुर्वीच्या वीजचोरी प्रकरणी महावितरण कंपनीच्या अधिका-यांने मृत्यूशी झुंज देत असलेल्या प्रशांत पाटील गडाख यांच्यासह अठरा संचालकांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर आमदार शंकरराव गडाख यांनी बोलविलेल्या मेळाव्यात जेष्ठ नेते गडाख बोलत होते. भैय्यासाहेब देशमुख, नानासाहेब रेपाळे,'मुळा'चे अध्यक्ष नानासाहेब तुवर, कडुबाळ कर्डीले, जबाजी फाटके, विश्वासराव गडाख आदी उपस्थित होते.

Ahmednagar Politics : Shankarrao gadakh : Balasaheb Murkute : Yashawantrao Gadakh
Chinchwad By Election Result : पैसा आणि पोलिसांच्या बळावर भाजपचा चिंचवडला विजय; पराभवानंतर राष्ट्रवादीचा दावा!

आमदार गडाख यांनी आपल्या भाषणात दुध संघातील वीज मीटरवर महावितरणचे नियंत्रण होते.अनेकदा केलेल्या तपासणीत कधीच वीजचोरी आढळली नसताना, राजकीय द्वेषातून विरोधकांनी हे कुभांड रचल्याचा आरोप केला.

राजसत्तेच्या माध्यमातून तालुक्यातील कल्याणकारी संस्था बंद पाडण्याचे षडयंत्र विरोधकांकडून रचले जात असल्याच्या आरोप करून जिल्ह्याच्या साखर कारखानदारीत मुळा कारखान्याचे सर्वात कमी प्रदुषण असतानाही प्रदुषण नियंत्रण मंडळाकडे खोट्या तक्रारी दिल्या आहेत. भावजय गौरी प्रशांत गडाख, त्यानंतर प्रतिक काळे आकस्मित मृत्यु प्रकरणी आमदार गडाख यांनी उपस्थितांसमोर सत्य भूमिका स्पष्ट करुन, त्यांच्या मृत्यूचे भांडवल करुन, आपल्या कुटुंबाला मानसिक व कायदेशीर त्रास दिल्याचे सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com