Ajit Pawar: अजितदादांनी राज ठाकरेंना करून दिली 'त्या' मुलाखतीची आठवणं...

Ajit Pawar : माणसानं इतकंही दुटप्पीपणे वागू नये.
Raj Thackeray  Ajit Pawar News Latest News
Raj Thackeray Ajit Pawar News Latest NewsSarkarnama

पुणे : राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेला आरोप धांदात बिनबुडाचे, तथ्यहीन आणि हास्यास्पद आहे. माणसानं इतकंही दुटप्पी वागू नये, अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना सुनावले आहे.

शरद पवार यांनी सुरूवातीपासून जातीपातीचं राजकारण केलं. राष्ट्रवादीच्या जन्मापासूनच जातीपातीच्या राजकारणाला सुरुवात झाली,असा राज ठाकरे यांनी केला होता. त्यांच्या या आरोपाला अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी बारामतीमध्ये माध्यमांशी संवाद साधला. (Raj Thackeray Ajit Pawar News Latest News)

Raj Thackeray  Ajit Pawar News Latest News
Sushma Andhare : महिला मुख्यमंत्र्यांच्या रेस मध्ये नाही, हे केवळ कंड्या पिकवण्याचे काम…

अजित पवार म्हणाले, शरद पवार यांचं नाव नघालं की त्याची बातमी होते. राज ठाकरेंसारख्या व्यक्तीने असं वक्तव्य करण योग्य नाही. शरद पवारांची मुलाखत घेताना ते वेगळ बोलत होते. माणसानं इतकंही दुटप्पीपणे वागू नये. पवारसाहेबांना ५५ वर्षापासून उभा महाराष्ट्र ओळखत आहे. त्यांनी नेहमी शाहू-फुले-आंबेडकरांचा विचार डोळ्यासमोर ठेवला. आणि तशाच पद्धतीने सर्व जाती-धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाण्याचं काम केलं आहे. राज ठाकरेंनी केलेले आरोप हे हास्यास्पद असून यामध्ये नगभरही तथ्य नाही, अशा शब्दात त्यांनी राज ठाकरेंना (Raj Thackeray) सुनावले.

Raj Thackeray  Ajit Pawar News Latest News
Udayanraje Bhosale : छत्रपतींच्या समाधीसमोर खासदार उदयनराजे मांडणार वेदना

दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी सुरूवातीपासून जातीपातीचं राजकारण केलं.राष्ट्रवादीच्या जन्मापासूनच जातीपातीच्या राजकारणाला सुरुवात झाली.राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर महाराष्ट्रात हे प्रकार सुरू झाले. पवार हे नेहमी शाहू-फुले-आंबेडकर हीच नावे घेतात. शिवाजी महाराजांचे यामध्ये नाव घेत नाहीत. इतर समाज आणि मराठा समाजात फूट पाडण्याचे काम सुरू असून १९९९ पासून राज्यात विष कालवले जात असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com