सोलापूर जिल्हा बॅंक चालवायला मी अन्‌ शरद पवारांनी यायचं का? : अजितदादांनी सुनावले

सोलापूर डीसीसीवरून अजितदादांनी पुन्हा जिल्ह्यातील नेतेमंडळींवर राग व्यक्त केला
Ajit Pawar
Ajit Pawarsarkarnama
Published on
Updated on

सोलापूर : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि सोलापूर (Solapur) जिल्हा हे अतूट नाते आहे. सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक घडामोडींवर पवार यांचे बारिक लक्ष असते, याची जाणीव वारंवार होत आहे. एकेकाळी शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळख असलेल्या सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची (Solapur DCC bank) लागलेली वाट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आज सलत असल्याचे प्रकर्षाने जाणवले. ‘सोलापूर जिल्हा बँकेत तुम्हाला विश्‍वस्त म्हणून पाठविले होते; मालक म्हणून नाही. त्या त्या भागातील नेतेमंडळींनी बॅंका आणि कारखाना चांगल्या चालवाव्यात ना. त्या चालविण्यासाठी मी आणि शरद पवारांनी (sharad pawar) यायचं का?, असा खडा सवाल करत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुन्हा एकदा बँकेच्या तत्कालीन संचालकांवर आपला राग व्यक्त केला. (Ajit Pawar again expressed anger At leaders on Solapur DCC issue)

अनगर (ता. मोहोळ) येथे आज झालेल्या शेतकरी मेळाव्यात उपमुख्यमंत्री पवारांनी माजी संचालकांना खडे बोल सुनावले. तुमच्या सहकारी संस्था या तुम्हीच चांगल्या पद्धतीने चालविल्या पाहिजेत. मी माझ्या ताब्यातील संस्था चांगल्या पद्धतीने चालवितो; म्हणून महाराष्ट्रात गडचिरोली असो की मोहोळ कुठेही ठोकून बोलतो, असेही उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.

Ajit Pawar
मोहोळचे प्रश्न सोडविण्यासाठी सर्वस्व पणाला लावेन : अजितदादांचा राजन पाटलांना शब्द!

ते म्हणाले की, त्या भागातील नेतेमंडळींनी बॅंका आणि कारखाना चांगल्या चालवाव्यात ना. त्या संस्था चालविण्यासाठी मी आणि शरद पवारांनी यायचं का? आम्हाला आमची पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंक चांगली चालवता येते, मग सोलापूर जिल्ह्यातील नेतेमंडळींना ती काय चांगली चालवता येत नाही? बॅंक कुणी अडचणीत आणली, ती कुणामुळे अडचणीत आली. मी बोललो की म्हणतात की लयं बोलतो. पण खरं आहे, तेच बोलतो ना. बँक अडचणीत येण्यात शेतकऱ्यांची काहीच चूक नाही. बँक अडचणीत येण्यास संचालक मंडळ जबाबदार आहे. सभासदांनी तुम्हाला बँकेत विश्‍वस्त म्हणून पाठविले होते; मालक म्हणून नाही, असे खडे बोल अजित पवार यांनी बँकेच्या माजी संचाकांना जाहीर सभेत सुनावले.

Ajit Pawar
राज ठाकरे यांच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात, दोन मराठी कलाकारांच्या गाडीचे नुकसान

विधीमंडळाच्या अधिवेशनात विधानपरिषदेत सोलापूर डीसीसीच्या निवडणुकीचा प्रश्‍न विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केला होता. त्यावेळीही उपमुख्यमंत्री पवार यांनी अशीच रोखठोक भूमिका घेतली होती. सोलापूर जिल्हा बँकेच्या संचालकांनी व संचालकांच्या समर्थकांनी भरमसाठ कर्जे घेतली. कर्जे थकविली त्यामुळे २०१८ पासून या बँकेवर प्रशासक कार्यरत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com