आर्यन खानबाबत अजितदादा म्हणाले, 'मुलं कोणाचीही असो, नियम सगळ्यासाठी सारखाच'

अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, ''मुलगा कोणाचाही असो त्याच्यावर कायदेशीर कारवाई होईल. प्रत्येकाला कायदा आणि नियम सारखेच आहे, हे सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे.''
 Ajit Pawar, Aryan Khan, Shahrukh Khan
Ajit Pawar, Aryan Khan, Shahrukh Khansarkarnama
Published on
Updated on

सातारा : गोवा क्रूज ड्रग्स पार्टी संदर्भात 'किंग खान' शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला नार्कोटिक्स ब्युरोने अटक केली आहे. एनसीबीकडून आर्यन खानची चौकशी सुरू आहे. या चौकशीदरम्यान काय माहिती समोर येणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. यावर उपमुखमंत्री अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, ''या प्रकरणाचा एनसीबी तपास करीत आहे. मुलगा कोणाचाही असो त्याच्यावर कायदेशीर कारवाई होईल. प्रत्येकाला कायदा आणि नियम सारखेच आहे, हे सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे.''

एनसीबीने मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या एका क्रुझवर ( CRUISE ) छापा टाकत हायप्रोफाईल ड्रग्स पार्टीचा (High-profile drugs party) पर्दाफाश केला. या कारवाईत एकूण १० जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा (Shahrukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याच्यासह दोन तरुणींचाही समावेश आहे. एका परदेशी कंपनी आणि एका मनोरंजन वाहिनीने संयुक्तपणे आयोजित केलेल्या या पार्टीला देशातील श्रीमंत घरातील आणि सेलिब्रिटींच्या घरातील तरुण मुलांचाही समावेश होता.

 Ajit Pawar, Aryan Khan, Shahrukh Khan
ठाकरे सरकार खड्ड्यात गेल्याशिवाय राहणार नाही

NCB सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ड्रग्ज पार्टी प्रकरणात आर्यन खानसह, मुनमुन धामेचा आणि अरबाज मर्चंटला न्यायालायाने एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. आपल्या मुलानं ड्रग्स घ्यावेत ही इच्छा यापूर्वी शाहरुखनेच बोलून दाखवली होती. यावरून आता अभिनेता शाहरुख खानला (shahrukh khan) ट्रोल केले जात आहे. शाहरुख खानने आपला मुलगा आर्यनबद्दल एका मुलाखतीत असे काही सांगितले होते की ज्याची कल्पनाही कोणी करू शकत नाही. ''आर्यनला सर्व चुकीच्या गोष्टी करु शकतो ज्या मी तरुणपणात करू शकल्या नाहीत,'' असं शाहरुखने म्हटले होते. आपल्या वडीलांचे स्वप्न आर्यनं (aryan khan) पूर्ण केल्याची चर्चा सध्या समाजमाध्यमांवर रंगली आहे.

गोवा क्रूज ड्रग्स पार्टी संदर्भात 'किंग खान' शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला नार्कोटिक्स ब्युरोने अटक केली आहे. आर्यन खान सध्या एनसीबीकडून चौकशी सुरू असून त्याला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर किंग खानचे च्या त्या मुलाखतीचे जुने व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत. सिमी ग्रेवालच्या टॉक शोमधील (Simi Grewal talk show) शाहरुख खानने केलेली ही वक्तव्ये आता या प्रकरणामुळे पुन्हा व्हायरल होत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com