Ajit Pawar: दुसऱ्याच्या पक्षांमध्ये नाक खूपसू नका; अजितदादांचा रोहित पवारांना टोला

Ajit Pawar attack on Rohit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राष्ट्रवादीवर सडकून टीका केली होती.सुनील तटकरे यांनी पक्ष हायजॅक केल्याचे म्हटले होते. या बोचऱ्या टीकेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
Rohit Pawar News
Rohit Pawar News Sarkarnama
Published on
Updated on

थोडक्यात

  1. कोल्हापूर दौऱ्यात अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे रोहित पवार यांच्यावर टीका करत "दुसऱ्याच्या पक्षात नाक खुपसू नका" असा सल्ला दिला.

  2. आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी महायुती व विरोधक कार्यकर्त्यांचे मेळावे घेऊन तयारीत आहेत.

  3. शेतकऱ्यांचे झालेले पावसामुळे नुकसान भरपाईसाठी पंचनामे सुरू करण्याचे आदेश दिले असून, कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे उद्घाटन होणार आहे.

Kolhapur News : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी अजितदादांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला. "काही जणांना वाटतं आपण लईचं मोठे झालो आहोत. सगळ्या महाराष्ट्राचे नेतृत्व यांच्याकडेच आहे. त्यांनी त्यांच्या पक्षाचे बघावं, आम्ही आमच्या पक्षाचे बघतो. दुसऱ्याच्या पक्षांमध्ये नाक खूपसण्याचे काही कारण नाही," असे रोहित पवार यांचे नाव न घेता अजितदादांनी त्यांना टोला लगावला.

रोहित पवार यांनी नुकतेच अजितदादांचा पक्ष कोकणातील एका नेत्याने हायजॅक केला आहे, अशी टीका केली होती. सध्या भाजपमध्ये एकाधिकारशाहीची स्टाईल आहे. आता कदाचित तिच स्टाईल अजितदादांच्या पक्षात देखील रूजताना दिसत आहे. त्यांच्या कोकणातील एका नेत्याने त्यांचाच पक्ष हायजॅक केलं आहे. हे सर्व लोक नंतर भारतीय जनता पक्षात जातील असाही दावा त्यांनी केला होता. यानंतर आज अजितदादांनी कोल्हापुरात रोहित पवारांच्या टीकेला उत्तर दिले आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळेच पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. यावर अजित पवार म्हणाले, "महायुतीतले सर्वच नेते आपापला पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामध्ये कोणतेही गैर नाही. विरोधक देखील आपापल्या परीने पक्ष वाढवित आहेत. त्यामुळेच मी आज सांगलीमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला आहे. 25 तारखेला कोल्हापूर जिल्ह्यातील देखील कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे"

राज्यात सुरु असलेल्या पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. मराठवाडा आणि विदर्भामध्ये पावसाचा जोर अधिक आहे.त्यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. सरकार म्हणून आम्ही अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.पंचनामे सुरु करा, कोणत्याही आदेशाची वाट पाहू नका, असे अजित पवारांनी सांगितले.

मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे कोल्हापूरात उद्या उद्धघाटन होणार आहे. देशाचे सरन्यायाधीश यांच्या हस्ते हे उद्धघाटन होणार आहे. "गेल्या अनेक दिवसापासून कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे, अशी अनेकांची मागणी होती, कोल्हापुरसह सहा जिल्हातील नागरिकांना हे खंडपीठ उपयुक्त ठरेल असा विश्वास अजित पवारांनी व्यक्त केला.

प्रश्न 1: अजित पवार यांनी कोणावर अप्रत्यक्ष टीका केली?
उत्तर: राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांच्यावर.

प्रश्न 2: स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी अजित पवार काय तयारी करत आहेत?
उत्तर: सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात कार्यकर्त्यांचे मेळावे आयोजित करत आहेत.

प्रश्न 3: शेतकऱ्यांच्या नुकसानीसंदर्भात अजित पवारांनी काय आदेश दिले?
उत्तर: तत्काळ पंचनामे सुरू करून शेतकऱ्यांना मदत द्यावी असे आदेश दिले.

प्रश्न 4: कोल्हापुरात कोणते महत्त्वाचे उद्घाटन होणार आहे?
उत्तर: मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे उद्घाटन सरन्यायाधीशांच्या हस्ते होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com