Ajit Pawar News : गौतम अदानींसोबतच्या फोटोवरून ट्रोल होताच अजित पवार संतापले; म्हणाले...

Maharashtra Politics: ...तरी आमच्या अंगाला भोकं पडत नाहीत.
Ajit Pawar News, Jalna
Ajit Pawar News, JalnaSarkarnama
Published on
Updated on

Satara News : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मागील काही दिवसांत अदानी प्रकरणावरुन चांगलेच आक्रमक झाले असून सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत आहे. याचवेळी हिंडेनबर्ग संस्थेने जारी केलेल्या अहवालावरुन विरोधकांनी मोदी सरकारविरोधात राळ उठवली आहे. याचदरम्यान,राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अदानी व हिंडेनबर्ग अहवालावर मोठं विधान करत राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडवून दिली आहे.

आता राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा उद्योगपती गौतम अदानी यांच्यासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.यामुळे राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे. तसेच त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल देखील करण्यात आल्यामुळे पवार चांगलेच संतापले.

Ajit Pawar News, Jalna
Rajasthan Congress News : आपल्याच सरकारच्या विरोधात माजी उपमुख्यमंत्र्याचं धरणे आंदोलन ; CM गेहलोत यांच्यावर हल्लाबोल

अजित पवार(Ajit Pawar) हे रविवारी (दि.९) सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांच्याहस्ते विविध कार्यक्रम पार पडणार आहेत. याचदरम्यान,भाजप नेते अमित कदम यांच्यासह अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. यावेळी पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. अदानींसोबतच्या व्हायरल झालेल्या फोटोवर त्यांनी टीकाकारांवर चांगलीच आगपाखड केली.

टाटा-बिर्लासारखाच अदानींनीही रोजगार दिला..

अजित पवार म्हणाले, अदानींसोबतचाच फोटो आहे ना? कोणत्या अंडरवर्ल्ड डॉनसोबत तर फोटो नाही काढला ना? असा सवाल करतानाच कोणालाही लगेच आरोपीच्या पिंजऱ्यात उभ करणं योग्य नसल्याचं टाटा-बिर्ला यांनी कित्येक लोकांना रोजगार दिला. तसेच अदानींनी केले. त्यांनी म्हटलं.

Ajit Pawar News, Jalna
Tigers in India: भारतात वाघांची संख्या वाढली! पंतप्रधान मोदींनी थेट आकडेवारीच जाहीर केली

...तर आमच्या अंगाला भोकं पडत नाहीत!

काँग्रेस नेत्या अलका लांबा यांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेलाही अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले. पवार म्हणाले, कोणी आम्हाला काही म्हटले तरी आमच्या अंगाला भोकं पडत नाहीत, आम्ही कोणच्याही प्रश्नाला उत्तर देण्यासाठी बांधिल नाहीत. आम्हाला तेवढेच काम नाही. जे महत्त्वाचे व्यक्ती आहेत, त्यांच्या प्रश्नाला उत्तर देणे आमचे काम आहे. असे तर रोज 'हवसे-गवसे-नवसे' टीका करतील, अशा शब्दांमध्ये अजित पवार यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

आम्ही त्याबद्दल बोलू शकत नाही...

अजित पवार म्हणाले, समिती अदानी यांच्याबाबत चौकशी करेल. लगेचच कोणाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे योग्य नाही. मीही काल शरद पवारांची मुलाखत बघितली. शरद पवार हे आमचे सर्वोच्च नेते आहेत. आमच्या पक्षाच्या सर्वोच्च नेत्याने भूमिका मांडल्यानंतर आम्ही त्याबद्दल बोलू शकत नाही. त्यांची जी भूमिका आहे, तीच आमच्या पक्षाची भूमिका आहे असेही स्पष्टीकरण पवार यांनी दिले.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com