Prithviraj Chavan on Ajit Pawar: "काल जे झालं ते आपण सर्वांनी पाहिलं. आज शरद पवार दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृती स्थळाचे दर्शन घ्यायला येणार आहेत. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत ते अजून आमच्या महाविकास आघाडीचे घटक आहेत, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे. ते साताऱ्यात बोलत होते. (Ajit Pawar has been promised the post of Chief Minister by BJP; Prithviraj Chavan's secret explosion)
राष्ट्रवादीतील फुटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) सोमवारी (३ जुलै) कराडमध्ये दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले. त्यांच्यासोबत खासदार सुप्रिया सुळे, वंदना चव्हाण, आमदार रोहित पवार हे आहेत. शरद पवार स्मृतीस्थळावर पोहचण्या आधी त्यांनी माध्यमांशी बोलताना हा गौप्यस्फोट केला आहे.
अजित पवार भाजपसोबत जाऊ शकतात, असं मी जाहीरपणे सांगितलं होते.त्यामुळे मीच अडचणीत आलो होतो.पण ते काल भाजपसोबत गेल्याचं सर्वांनी पाहिलं. भाजपसोबत गेलेल्या अजित पवार यांना मुख्यमंत्री पदाचा शब्द आहे. अशी माहिती आमच्यापर्यंत पोहचली आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई होईल आणि ते बाजूला झाले की अजित पवार मुख्यमंत्री होतील, अशीही माहिती आमच्यापर्यंत पोहचली आहे. पण आताच ठाम असं काही सांगू शकत नाही, असा धक्कादायक गौप्यस्फोट पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.
पण शरद पवार साहेब हे भक्कमपणे राष्ट्रीय विरोधी पक्षाच्या आघाडीत आहेत. ते मंगलोरलाही जाणार आहेत. महाविकास आघाडी आहे अशीच राहिलं. असंही यावेली पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान एप्रिल महिन्यातही अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. एका इंग्रजी वृत्तपत्र संस्थेने याबाबत सर्वात आधी वृत्त प्रसिद्ध केलं होतं. राष्ट्रवादीच्या ५४ पैकी ४० आमदरांचा एक गट भाजप सोबत जाणार असल्याचा दावा या वृत्तात करण्यात आला होता.
न्यू इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्रातील बातमीने राज्यभरात खळबळ माजवली आहे. अजित पवार एकाएकी पुण्यातले सगळे कार्यक्रम रद्द करून मुंबईत गेले. मुंबईत आपल्या विश्वासू व्यक्तींसोबत त्यांची खलबतं सुरु आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या 53 पैकी 40 आमदारांना घेऊन अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याचा दावा या वृत्तातून करण्यात आला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.