Ajit Pawar Satara Tour : अजितदादा अचानकपणे सातारच्या गेस्ट हाऊसवर आले अन्‌ अधिकाऱ्यांना फैलावर घेऊन गेले!

Satara News : उपमुख्यमंत्री अजित पवार अचानक सातारा विश्रामगृहात आले. पोर्चमधील फुटलेल्या फरशा पाहून त्यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले आणि तातडीने दुरुस्ती करण्याचे आदेश दिले.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on
  1. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सातारा दौऱ्यात विश्रामगृहातील पोर्चच्या फुटलेल्या फरशा न बदलल्याचे पाहून ते संतापले.

  2. त्यांनी यापूर्वीच अधिकाऱ्यांना फरशा बदलण्याचे आदेश दिले होते, पण दुर्लक्ष झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

  3. कोट्यवधी खर्च करूनही निकृष्ट दर्जाचे काम झाल्याबद्दल पवारांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला फैलावर घेतले.

Satara, 03 October : उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज (ता. 03 ऑक्टोबर) सकाळी अचानक अल्पवेळासाठी सातारा शासकीय विश्रामगृहात आले होते. अजितदादांच्या या दौऱ्यामुळे अधिकाऱ्यांची एकच तारांबळ उडाली. नवीन विश्रामगृहाच्या पोर्चमधील फरशांना तडे गेल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांना आढळले आणि त्यांचा पारा अचानक वाढला. या फुटलेल्या फरशा अजून का बदलल्या नाहीत, अशी विचारणा करत अधिकाऱ्यांना फैलावर घेतले.

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार हे मागील वेळी सातारच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी या फुटलेल्या फरशा बदला, अशी सूचना अधिकाऱ्यांना केली होती. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यावर अजित पवारांनी ‘आतातरी या फरशा बदला,’ असे कडक शब्दांत सांगितले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज सकाळी नवीन शासकीय विश्रागृहात जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या वेळी पोलिस अधीक्षक तुषार जोशी, तसेच बांधकाम विभागासह इतर विभागांचे अधिकारी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार हे गाडीतून उतरल्यावर त्यांचे लक्ष पोर्चखालच्या फुटलेल्या फरशा बदलल्या नसल्याचे लक्षात आले.

परत जाताना ते पोर्चखाली थांबले. त्यांनी फुटलेल्या फरशांबाबत अधिकाऱ्यांना विचारणा केली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या उत्तरामुळे अजित पवार चांगलेच भडकले. बांधकामासाठी कोट्यवधी रुपये खर्च करुनही असे निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याने त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले.

Ajit Pawar
Solapur News : कोल्हापूरमधील राजकीय दोस्त धावले सोलापूरच्या पूरग्रस्तांच्या मदतीला

मागील वेळी अजित पवार हे विश्रामगृहात आले होते, त्यावेळी त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना या फुटलेल्या फरशा बदला, असे सांगितले होते. मात्र, त्याकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचे अजित पवार यांच्या लक्षात गाडीतून उतरताच लक्षात आले, त्यामुळे त्यांनी अधिकाऱ्यांचे कान धरत आतातरी या फुटलेल्या फरशा बदला, असा सल्ला दिला.

याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे सातारा जिल्ह्यात त्याची एकच चर्चा सुरू झाली आहे. अधिकाऱ्यांना सूचना दिल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार हे जरंडेश्वर साखर कारखान्याकडे रवाना झाले.

Ajit Pawar
Bhaskar Jadhav : ‘छमछमदास, बामदास, भडवेगिरी करणारा, श्वान....’ भास्कर जाधवांकडून रामदास कदमांवर हल्लाबोल

प्रश्न 1 : अजित पवार साताऱ्यात का आले होते?
शासकीय विश्रामगृहातील दौऱ्यासाठी ते आले होते.

प्रश्न 2 : त्यांनी कोणत्या मुद्द्यावर अधिकाऱ्यांना सुनावले?
फुटलेल्या फरशा न बदलल्याबद्दल.

प्रश्न 3 : या फरशांबाबत त्यांनी आधी काय सूचना दिल्या होत्या?
मागील दौऱ्यातच फरशा बदलण्याचे आदेश दिले होते.

प्रश्न 4 : या घटनेनंतर काय घडले?
त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि चर्चेला उधाण आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com