Ajit Pawar News : वाचाळवीरांची संख्या वाढत चालली; अजित पवारांनी सर्वच पक्षांना सुनावले...

Ajit Pawar On Priti Sangam : "अलीकडे कोणी काही बोललं तरी, आरेला कारे केले जाते..."
Ajit Pawar News
Ajit Pawar News Sarkarnama
Published on
Updated on

हेमंत पवार -

Ajit Pawar News : महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज शनिवारी (ता.२५) अभिवादन करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार कराड दौऱ्यावर आले आहेत. अजित पवार यांनी प्रीतिसंगम, कराड येथील समाधीस्थळावर पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. यानंतर त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. (Latest Marathi News)

Ajit Pawar News
Ajit Pawar News : जरांगे विरुद्ध भुजबळ वादावर अजित पवार बोलले, 'आरक्षण मागण्याचा सगळ्यांना अधिकार पण...'

"अलीकडे वाचाळवीरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. प्रत्येकाला आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे. त्या अधिकाराचा वापर आपण कशाप्रकारे करायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मात्र, अलीकडे कोणी काही बोलतो. आरेला कारे केले जाते. ही शिकवण ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांनी दिलेली नाही. ही महाराष्ट्राची परंपरा-संस्कृती नाही, हे सर्वांनीच ध्यानात घेतले पाहिजे," असा टोला सर्व राजकर्त्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगावला.

अजित पवार म्हणाले, "विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात एकोपा निर्माण करून समाजकारण आणि राजकारण कसे करायचे याची आदर्श मुहूर्तमेढ व शिकवण स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी घालून दिली. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी त्या काळात घेतलेले निर्णय आजही महत्त्वपूर्ण ठरतात. त्यांचे विचार, त्यांचे साहित्य हे आजही आपणा सर्वांसाठी मार्गदर्शक आहे."

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ajit Pawar News
NCP Crisis News : 'अजित पवारांचा पक्ष विस्तारामध्ये कुठलाही हातभार नाही'; शरद पवार गटाच्या वकिलांचा मोठा दावा

राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रीतिसंगम, कराड येथील समाधीस्थळावर पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर उपमुख्यमंत्री पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी आमदार दीपक चव्हाण, माजी आमदार आनंदराव पाटील, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलिस अधीक्षक समीर शेख, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com