विकास कामात अडथळा आणला तर जवळचा आहे की लांबचा हे बघत नाही !

“मला आत्ता एक व्हिडिओ क्लिप मिळाली. त्यानंतर मी ताबडतोब पोलिस अधीक्षकांना बोलावलं.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

सातारा : "विकास कामात अडथळा आणला तर ती व्यक्ती माझ्या घरातील असो की राष्ट्रवादीची (ncp)असो, आम्ही पोलिसांना कारवाई करण्यास सांगतो, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं. (ajit pawar latest news)

अजित पवार (ajit pawar) यांनी सातारा दौऱ्यात लोकप्रतिनिधी, ठेकेदार, अधिकाऱ्यांना सज्जड दम दिला. यावेळी अजित पवार यांनी राज्यातील काही भागातील काही लोकप्रतिनिधी चुकीचं वागत असल्याचं आणि त्याबाबत एक व्हिडीओ क्लिप मिळाल्याचं सांगितलं.

“मला आत्ता एक व्हिडिओ क्लिप मिळाली. त्यानंतर मी ताबडतोब पोलिस अधीक्षकांना बोलावलं. मी अभयसिंग जगताप यांच्या घरात जेवायला थांबलो होतो तेव्हा पोलिस अधीक्षकांना ती क्लिप दाखवली. संबंधितांना बोलावून ठेकेदाराचं काही चुकत असेल तर त्याला समजाऊन सांगण्यास सांगितलं. मात्र, लोकप्रतिनिधींच्या नावावर कुणी चुकीचं काम करत असेल तर ते खपवून घेऊ नका, असं पोलिसांना सांगितलं आहे,” असे अजित पवार म्हणाले.

Ajit Pawar
नुपुर शर्मांना औरंगाबादच्या चौकात फाशी द्या, म्हणणाऱ्या जलीलांची आता सारवासारव

अजित पवार म्हणाले, "उद्योगांसाठी चांगलं वातावरण असलं पाहिजे. उद्योगपतीला देखील आपण लावलेला पैसा परत मिळेल, बँकेचे हप्ते परत जाणार आहेत हा विश्वास मिळाला पाहिजे. बारामतीत उद्योग मालकाने फोन करून लोकं अडचणी निर्माण करतात असं सांगितलं, तर तो माझा घरातील असो किंवा राष्ट्रवादीचा असो आम्ही पोलिसांना कारवाई करण्यास सांगतो,”

"काही अडचण आली तर ठेकेदाराला मदत करायची असते.उद्योगपतीच्या विकास कामात आड आलं तर आम्ही अडथळा आणणारा आमच्या जवळचा आहे की लांबचा आहे हे बघत नाही,” असे पवार यांनी सांगितलं.

"काही जिल्ह्यात विकास कामांमध्ये अडथळे निर्माण केले जात आहेत. काही दिवसापूर्वी मध्यंतरी नितीन गडकरी यांनी देखील मुख्यमंत्र्यांसह आम्हा सर्वांकडे तक्रार केली होती. महाराष्ट्रात काही भागात काही लोकप्रतिनिधी चुकीचं वागत आहेत, असे पवार म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com