अजित पवारांनी सांगितले, सोलापूर जिल्हा बॅंकेची निवडणूक कधी होणार?

निवडणूक लावल्यानंतर काय निकाल येणार आहे, हे तुम्हाला आणि मलाही माहिती आहे की माळशिरसमधून कोण निवडून येणार आणि माढ्यातून कोण निवडून येणार आहे.
Ajit Pawar on solapur Dcc Bank election Date News, Ajit Pawar News
Ajit Pawar on solapur Dcc Bank election Date News, Ajit Pawar NewsSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : सोलापूर जिल्हा सहकारी बॅंकेवर (Solapur District Bank) आजही प्रशासक आहे. पूर्वीच्या तुलनेत या जिल्हा बॅंकेच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होत आहे, त्यामुळेच आम्ही या जिल्हा बॅंकेची निवडणूक लावत नाही आहोत. सोलापूर जिल्हा सहकरी बॅंक पूर्णपणे आर्थिक परिस्थितीतून बाहेर येत नाही; तोपर्यंत त्या बॅंकेची निवडणूक लावायची नाही, अशी भूमिका सरकार म्हणून आम्ही स्वीकारली आहे, असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगून या बॅंकेची निवडणूक कधी होणार हे अप्रत्यक्षपणे सूचित केले आहे. (Ajit Pawar says when will Solapur District Bank elections be held)

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केलेल्या आरोपाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार सभागृहात बोलत होते. ते म्हणाले की, सोलापूर जिल्हा सहकारी बॅंकेवर आजही प्रशासक आहेत. पूर्वीच्या तुलनेत ही जिल्हा बॅंक सध्या सुधारत आहे. हे येथे बसलेले भाजप आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनाही विचारा. या बॅंकेची स्थिती सुधारत आहे; म्हणूनच आम्ही तिथे निवडणूक लावत नाही. कारण, निवडणूक लावल्यानंतर काय निकाल येणार आहे, हे तुम्हाला आणि मलाही माहिती आहे की माळशिरसमधून कोण निवडून येणार आणि माढ्यातून कोण निवडून येणार आहे, ते. या दोन्ही तालुक्यांत संस्था त्यांच्याच (माळशिरसमध्ये मोहिते पाटील आणि माढ्यात आमदार बबनराव शिंदे) ताब्यात आहेत, त्यामुळे दुसरे कोणी निवडूनही येऊ शकत नाही. जोपर्यंत सोलापूर जिल्हा बॅंक पूर्णपणे आर्थिक परिस्थितीतून बाहेर येत नाही; तोपर्यंत त्या बॅंकेची निवडणूक लावायची नाही, अशी भूमिका आम्ही सरकार म्हणून स्वीकारली आहे. (solapur Dcc Bank election Date News)

Ajit Pawar on solapur Dcc Bank election Date News, Ajit Pawar News
आदिनाथ ‘बारामती ॲग्रो’च चालवणार : काहींचा डाव मी ओळखून आहे : रोहित पवार

अर्थमंत्री अजित पवार म्हणाले की, सोलापूर जिल्हा बॅंकेप्रमाणेच नाशिक जिल्हा बॅंकेच्याही आर्थिक परिस्थितीमध्ये सुधारणा होत आहे. त्या ठिकाणी तर सर्वपक्षीय लोक कारभार पाहायचे. पण त्या ठिकाणी आपण प्रशासक नेमला आहे. त्यानंतर आता ही बॅंक हळूहळू सुधारत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. पुणे जिल्हा बॅंकेबाबत त्यांनी या वेळी स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले राज्यात सध्या दोनच बॅंकेचा कारभार नावाजला जातो, त्यात पुणे जिल्हा सहकारी बॅंक आणि सातारा जिल्हा सहकारी बॅंकेचा समावेश आहे, असेही त्यांनी सभागृहाच्या लक्षात आणून दिले.

Ajit Pawar on solapur Dcc Bank election Date News, Ajit Pawar News
धनंजय महाडिकांनी कदमांच्या अर्ज भरण्याच्या रॅलीतच केला हलगीचा कडकडाट!

बॅंक कोणता पक्ष चालवत आहे, ते बघू नका. चुकीचे काम करत असेल तर तो सत्ताधारी पक्षाचा असूद्या किंवा विरोधी पक्षाचा असूद्या त्यांच्यावर कारवाई करायला तुम्ही मागे पुढे बघू नका, अशी सूचना मी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांना दिली आहे. त्यानुसार सहकार मंत्री पाटील यांनी तशी कारवाई केली आहे. बाळासाहेब पाटील हे एकाला एक आणि दुसऱ्याला एक अशी भूमिका घेणारे नाहीत, ते तुम्हा सर्वांना माहिती आहे. तसेच, राज्यातील साखर कारखान्यांच्या सुरू असलेल्या चौकशीला आपण कोठेही स्थगिती दिलेली नाही, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com