Marathwada Water Politics : बीडसह मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी पश्चिमेकडील पाणी पूर्वेकडे आणण्याच्या योजनेसाठी एक लाख कोटी रुपये खर्च झाले तरी त्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले जातील, अशी घोषणा काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. पण आता यावरून राजकारण तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. शिंदे गटाचे शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यानी तीव्र विरोध केला आहे.
पश्चिमेकडील पाणी पूर्वेकडे सोडण्यास आमचा विरोध आहे. आमचं पोट उपाशी ठेवून दुसऱ्याचं पोट आम्ही भरायला तयार नाही, अशी प्रतिक्रिया देत सदाशिव लोखंडे यांनी मराठवाड्याला पाणी देण्यास तीव्र विरोध केला आहे. आमच्या हक्काचं पाणी आम्ही देणार नाही काहीही झालं तरी चालेल. तसेच,राज्य सरकारने घाटमाथ्याच्या पाण्यासंदर्भात आम्हाला शब्द द्यावा, त्यासाठी आम्ही पाठपुरावा करू, असही लोखंडे यांनी म्हटलं आहे. लोखंडे यांच्या या भूमिकेमुळे मात्र राज्यात उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा पाणी प्रश्न पुन्हा पेटण्याची शक्यता आहे.
यंदाही मराठवाड्यात पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.मराठवाड्याच्या शेतीची तहान भागवण्यासाठी मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींकडून समन्यायी पाणी वाटपाच्या नियमानुसार पश्चिम महाराष्ट्रातील भरलेल्या धरणातून जायकवाडी धरणात पाणी सोडण्याची मागणी केली जात आहे. स्थानिक शेतकऱ्यांकडूनही ही मागणी जोर धरू लागली आहे. पण शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी या पाणी वाटपाला प्रखर विरोध केला आहे.
जालन्याचे घनसावंगीचे आमदार राजेश टोपे यांनी या संदर्भात नुकतीच बैठक घेतली. मतदारसंघातील शेतपिके आणि शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचा आढावा घेत त्यांनी शेतीसाठी जायकवाडी धरणातून पाणी सोडण्याची मागणी राज्य सरकारकडे केली आहे. जायकवाडी धरणात सध्या ३३ टक्के जिवंत पाणीसाठा उपलब्ध आहे. यातून खरीप पिकासाठी २०२ एम.एम.क्यू.पाणी उपलब्ध आहे. यामधून ताबडतोब एक रोटेशन लगेच दिले पाहिजे, अशी आग्रही मागणी या बैठकीत टोपेंसह सर्वानीच केली.
Edited By- Anuradha Dhawade
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.