अक्षय कर्डिलेंची मोठी घोषणा : राजकारणाचा नवा डाव ठरला

2022च्या मार्च महिन्यात अहमदनगर ( Ahmednagar ) जिल्हा परिषद व जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार आहे. या निवडणुकीसाठी शिवाजी कर्डिले ( Shivaji Kardile ) यांचे पूत्र अक्षय कर्डिले यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे.
Akshay kardile
Akshay kardileSarkarnama
Published on
Updated on

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम केव्हाही जाहीर होऊ शकतो. विधान परिषदेसाठी भाजपकडून ज्येष्ठ नेते माजी आमदार शिवाजी कर्डिले यांची उमेदवारी निश्चित समजली जात आहे. 2022च्या मार्च महिन्यात अहमदनगर जिल्हा परिषद व जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार आहे. या निवडणुकीसाठी शिवाजी कर्डिले यांचे पूत्र अक्षय कर्डिले यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. Akshay Kardile's big announcement : A new innings of politics

शिवाजी कर्डिले हे नगर तालुक्याचे आमदार होते. नगर तालुका मतदार संघाच्या विभाजनानंतर त्यांनी राहुरी मतदार संघातून निवडणूक लढवत दोन वेळा विजय मिळविला होता. 2019च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. या निवडणुकीत कर्डिले यांचे नगर तालुक्यातील मताधिक्य कमी झाल्याचे दिसून आले होते. शिवाय मागील जिल्हा परिषद निवडणुकीच्या वेळी कर्डिले यांच्या पॅनलमधील कोणताही उमेदवार निवडून आला नव्हता.

Akshay kardile
दुधवाला शिवा असा झाला सरपंच ! जुन्या आठवणीत रमले शिवाजी कर्डिले

शिवाजी कर्डिले यांनी विधानसभा निवडणुकीतील पराभवातून बऱ्याच गोष्टी शिकल्या आहे. पराभवानंतर शांत न बसता त्यांनी जनसंपर्क वाढविण्यास सुरवात केली आहे. त्यांच्या बरोबरच अक्षय कर्डिलेही जनसामान्यांच्या सुख-दुःखाच्या कार्यक्रमात सहभागी होताना दिसत आहेत. मोठा जनसंपर्क हीच कर्डिलेंची खरी ताकद आहे. नगर, पाथर्डी, राहुरी व श्रीगोंदे अशा चार तालुक्यांत कर्डिले यांचे समर्थक आहेत. नगर तालुक्यातील प्रत्येक गावात कर्डिले समर्थक आहेत. हीच ताकद अधिक वाढविण्यासाठी अक्षय कर्डिले यांनी नगर तालुक्यात मागील दोन वर्षात प्रयत्न केले आहेत.

कोविड काळात त्यांनी बाजार समितीच्या मदतीने सुरू असलेल्या कोविड सेंटरमध्ये मोठी मदत दिली. बुथ हॉस्पिटलला मदत केली. भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून तालुक्यात पक्ष संघटन मजबूत करण्याचे काम केले. शिवाजी कर्डिलें प्रमाणे तालुक्यातील जनसामान्याच्या सुख-दुःखाच्या कार्यक्रमांत उपस्थित राहत जनसंपर्क वाढविला आहे.

Akshay kardile
विखे, कर्डिलेंनी घेतली अग्नी दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांची भेट

हाच वाढता जनसंपर्क वाढल्यामुळे अक्षय कर्डिले यांनी जिल्हा परिषद निवडणूक लढविण्याचे निश्चित केले आहे. वय कमी असल्यामुळे या पूर्वी त्यांनी निवडणूक लढविलेली नव्हती. पहिल्यांदाच अक्षय कर्डिले निवडणुकीला सामोरे जात असले तरी त्यांच्यासाठी निवडणूक व त्यातील राजकारण त्यांना जुनेच आहे. शिवाजी कर्डिले यांचा अनुभव व अक्षय कर्डिले यांची युवा वर्गाची बांधलेली संघटन शक्ती यावर कर्डिले आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांत महाविकास आघाडीला मोठे आव्हान देण्यासाठी सज्ज झाले आहेत.

नगर तालुक्यातील सहाही जागा व पंचायत समितीवर सत्ता मिळविण्यासाठी अक्षय कर्डिले यांनी तयारी सुरू केली आहे. त्यासाठी इच्छुक उमेदवारांची निश्चिती. राजकीय व मतांची गणिते याची जुळवा जुळवही सुरू केली आहे. मात्र प्रतीक्षा आहे फक्त निवडणुकीतील राजकीय आरक्षण ठरण्याची. राजकीय आरक्षण ठरल्यावर ते कोठून लढणार हे निश्चित होणार आहे.

Akshay kardile
कर्डिलेंनी विखेंना भरविली मिठाई

मागील जिल्हा परिषद व विधानसभा निवडणुकांत आमची काही राजकीय गणिते चुकली होती. त्यातून आम्हाला काही शिकायला मिळाले. पुन्हा अशा चुका होऊ नयेत याची खबरदारी आम्ही घेतली आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणूक आम्ही पूर्ण ताकदीने लढविणार आहोत.

- अक्षय कर्डिले, नेते, भारतीय जनता युवा मोर्चा.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com