राजकारण तापले; पाटील अन् महाडिक गट आमने-सामने

अर्ज छाननीच्या वेळी पाटील आणि महाडिक गटांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
Kolhapur
Kolhapursarkarnama
Published on
Updated on

कोल्हापूर : कोल्हापूर विधान परिषदेच्या (Legislative Council) निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. गृहराज्यमंत्री काँग्रेसचे उमेदवार सतेज पाटील (Satej Patil) आणि त्यांचे पारंपारिक विरोधक भापचे उमेदवार माजी आमदार अमल महाडिक (Amal Mahadik) यांच्यात ही लढत होत आहे. आज (ता. २४ नोव्हेंबर) विधान परिषद अर्ज छाननीच्या वेळी पाटील आणि महाडिक गटांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दोन्ही गटात जोरता शाब्दिक चकमक झाल्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही गटांना पागंवले. या घटनेमुळे कोल्हापूरमध्ये आता चांगलेच राजकीय वातावरण तापू लागले असल्याचे दिसत आहे.

Kolhapur
काँग्रेसनं जुळवून घेतलं अन् भाजपमध्ये सुरू झाला हाय होल्टेज ड्रामा

अर्ज छाननी वेळी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडून राजेश लाटकर, सुनील मोदी, महादेव नरके, आदिल फरास तर माजी आमदार अमल महाडिक यांच्याकडून माजी खासदार धनंजय महाडिक व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

विधान परिषदेच्या पारंपारिक विरोधक या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा आमनेसामने आले आहेत. अर्ज छाननीच्यानंतर दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आमने सामने आले. त्यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली. जमावबंदीचा आदेश झुगारून कार्यकर्त्यांची गर्दी केली होती. पोलिस प्रशासन आता काय कारवाई करणार हे पाहावे लागणार आहे.

Kolhapur
बिनविरोध नकोच, मते मिळवून जिंकण्यातील आनंद बिनविरोध निवडणुकीत नाही!

दरम्यान, मंगळवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील कोल्हापूर दौऱ्यावर होते. त्यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले होते की, कोल्हापूरची निवडणूक तुल्यबळ होईल. कोल्हापूरमध्ये आम्हाला ४३ मते लागतात. ती मते भाजपच्या उमेदवाराला मिळतील, अशी व्यवस्था आम्ही केली आहे. विधान परिषद बिनविरोध करण्या संदर्भात त्यांना प्रश्ना विचरला असता ते म्हणाले होते, बिनविरोधचा प्रस्ताव आलेला नाही. मात्र, भाजप कोणताही प्रस्ताव देणार नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com