Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe PatilParesh Kapse

अमित शहांनी विखे पाटलांवर दाखविला विश्वास : दिले महसूलसारखे वजनदार खाते

देशाचे गृहमंत्री अमित शहा ( Amit Shaha ) यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील ( Radhakrishna Vikhe Patil ) यांच्यावर विश्वास दाखवत महसूलसारखे वजनदार खाते त्यांना दिले आहे.

अहमदनगर - राज्याच्या मंत्रीमंडळाचा नुकताच विस्तार झाला आहोत. या मंत्रीमंडळातील मंत्र्यांना आज खाते वाटप करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्र्यांचे खाते वाटप जाहीर केले. देशाचे गृहमंत्री अमित शहा ( Amit Shaha ) यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील ( Radhakrishna Vikhe Patil ) यांच्यावर विश्वास दाखवत महसूलसारखे वजनदार खाते त्यांना दिले आहे. या शिवाय त्यांच्याकडे पशूसंवर्धन व दुग्धविकास सारख्या खात्यांचाही कारभार असणार आहे.

राज्यातील मंत्रीमंडळात महसूल खाते मिळावे यासाठी रस्सीखेच सुरू होती. मात्र अमित शहा यांनी हे खाते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सारख्या अनुभवी नेत्याकडे सोपविले आहे. हे खाते मिळावे यासाठी चंद्रकांत पाटील ही प्रयत्नरत होते. महसूल खाते कोणाला मिळणार यावर राज्यात उलट सुलट चर्चा रंगली होती.

Radhakrishna Vikhe Patil
मंत्रीपदावरून भाजपत लॉबिंग : चंद्रकांत पाटलांना हव महसूल मंत्रीपद

मंत्रीपद मिळाव्यावर राधाकृष्ण विखे पाटील पहिल्यांदाच राहात्याला काल ( ता. 13 ) आले त्यांचे शिर्डी व प्रवरा लोणी येथे जल्लोषात स्वागत करण्यात आले होते. त्यावेळी उपस्थित पत्रकारांनी महसूल खात्या संदर्भात त्यांना प्रश्न विचारले असता त्यांनी वरिष्ट नेते योग्य तो निर्णय घेतील असे सांगितले होते. अखेर अपेक्षे प्रमाणे राधाकृष्ण विखे पाटील यांना महसूल खाते मिळाले आहे.

Radhakrishna Vikhe Patil
मंत्रीमंडळ विस्तार ; टीईटी घोटाळ्यात नाव आल्याने सत्तारांचा `बिसमिल्ला` होणार ?

थोरातांना शह

महाविकास आघाडी काळात बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल विभाग होता. विखे-थोरात संघर्ष हा सर्वश्रूत आहे. बाळासाहेब थोरात हे काँग्रेसमधील राज्यातील सध्याचे हायपावर नेते समजले जातात. त्यांना शह देण्यासाठी अमित शहा यांनी विखे पाटलांना महसूल खाते दिल्याची चर्चा आहे. मात्र या संघर्षात अहमदनगर जिल्ह्याला पुन्हा एकदा महसूल खाते मिळाले आहे.

अहमदनगरचे पालकमंत्री होणार

महसूल विभाग जाहीर होताच विखे पाटलांकडे अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद येईल, असे सांगितले जात आहे. ते नवीन मंत्रीमंडळातील अहमदनगर जिल्ह्याचे एकमेव मंत्री आहेत. अहमदनगर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस विरुद्ध भाजपला ताकद देण्यासाठी विखे यांनाच पालकमंत्रीपद मिळावे अशी भाजप कार्यकर्त्यांची मागणी आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहमदनगर जिल्ह्याचे शासकीय ध्वजारोहन राधाकृष्ण विखे पाटील यांनी करावे अशी सूचना दिली आहे. त्यामुळे उद्या होणारे शासकीय ध्वजारोहन कार्यक्रम मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते पोलीस कवायत मैदानात होणार असल्याचे समजते.

Radhakrishna Vikhe Patil
राधाकृष्ण विखे पाटील सातव्यांदा शपथबद्ध : ६ मुख्यमंत्र्यांसोबत काम करण्याचा अनुभव गाठीशी

मंत्र्यांचे खाते वाटप

राधाकृष्ण विखे पाटील - महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास
सुधीर मुनगंटीवार - वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय
चंद्रकांत पाटील - उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य
डॉ. विजयकुमार गावित - आदिवासी विकास
गिरीश महाजन - ग्राम विकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण
गुलाबराव पाटील- पाणीपुरवठा व स्वच्छता
दादा भुसे - बंदरे व खनिकर्म
संजय राठोड - अन्न व औषध प्रशासन
सुरेश खाडे - कामगार
संदीपान भुमरे - रोजगार हमी योजना व फलोत्पादन उदय सामंत- उद्योग
प्रा.तानाजी सावंत- सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण
रवींद्र चव्हाण - सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण
अब्दुल सत्तार - कृषी
दीपक केसरकर - शालेय शिक्षण व मराठी भाषा
अतुल सावे- सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण
शंभूराज देसाई- राज्य उत्पादन शुल्क
मंगलप्रभात लोढा - पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता, महिला व बालविकास

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com