अण्णा हजारे म्हणाले, राज्यात कायद्याचा धाक राहिला नाही...

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे ( Anna Hazare ) यांनी राज्य सरकारमध्ये असलेल्या लोकांच्या भूमिकेवर चिंता व्यक्त केली.
anna hajare
anna hajareSarkarnama
Published on
Updated on

पारनेर ( अहमदनगर ) : पारनेर तालुक्यातील जवळे या ठिकाणी अल्पवयीन सोळा वर्षीय मुलीची संशयास्पद रित्या हत्या झाली. त्यावर प्रतिक्रिया देताना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राज्य सरकारमध्ये असलेल्या लोकांच्या भूमिकेवर चिंता व्यक्त केली. Anna Hazare said, there is no fear of law in the state ...

अण्णा हजारे म्हणाले, राज्यातील महिला व विशेषतः अल्पवयीन मुलींवर अत्याचार होताना दिसत आहेत. याचा अर्थ कायद्याचा धाक राहिला नाही, असे गुन्हे म्हणजे मानवतेला एक प्रकरचा कलंक आहे. राज्याच्या गृहमंत्र्यावरच जर भ्रष्टाचाराचे आरोप होत असतील तर गुन्हेगारांवर कसा धाक राहणार असे अण्णा हजारे यांनी सांगितले.

anna hajare
अण्णा हजारे यांच्या दबावतंत्राला आले यश

हजारे पुढे म्हणाले, जर दिवसा ढवळ्या असे महिलांवर अत्याचार होत असतील तर राज्यातील महिला सुरक्षित नाही असा अर्थ होतो. या निमित्ताने राज्यात कायद्याचा धाक राहिला नाही असेही दिसून येते. ज्यांनी कायदे करावयाचे तसेच कायदा आणि सुव्यवस्था राखावयाची तेच भ्रष्टाचाराच्या आरोपात अडकले आहेत तर दोष कोणाला द्यावा असा प्रश्न हजारे यांनी उपस्थित केला.

महिला व विशेषतः अल्पवयीन मुलींवर होणारे अत्याचार, बलात्कार ही अतिशय गंभीर बाब आहे. पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक राहिलेला नसल्याने असे प्रकार होत आहेत. त्यासाठी येत्या अधिवेशनात कठोर कायदे करावेत अशी मागणी करत, अशा गुन्हेगारांना फाशीच्या शिक्षे शिवाय दुसरी शिक्षा असता कामा नये. त्याशिवाय असे अत्याचाराचे गुन्हे थांबणार नाहीत, असे हजारे म्हणाले.

anna hajare
मोदी, केजरीवाल आणि बेदींवर भडकले अण्णा हजारे

जवळे येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या घटनेचा हजारे यांनी या वेळी निषेध केला. ते म्हणाले या घटनेत त्या मुलीचा काय दोष आहे. की तिला अशी शिक्षा मिळली. आता गुन्हेगार शोधून त्यांना तातडीने कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी हजारे यांनी यावेळी केली. देशात घटनेनुसार कठोर कायदे करावेत. कायद्यांची कडक अमलबाजवणी केली तरच गुन्हेगारांवर वचक निर्माण होईल. मात्र यात पोलिसांची भूमिका महत्त्वाची आहे. पोलिसांचा जर वचक राहिला नसल्याने अशा दुर्दैवी घटना घडतात असेही शेवटी हजारे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com