वाईन विक्रीच्या विरोधात अण्णा हजारे करणार आमरण उपोषण

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे ( Anna Hazare ) यांनी आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.
Anna Hazare News Updates
Anna Hazare News UpdatesSarkarnama
Published on
Updated on

पारनेर ( जि. अहमदनगर ) - महाराष्ट्र सरकारने सुपरमार्केट व किराणा दुकानांत वाईन विक्रीला परवानगी दिली आहे. या विरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे ( Anna Hazare ) यांनी आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. अण्णा हजारे यांनी राळेगण सिद्धीत दारूबंदी केली आहे. ( Anna Hazare will go on an immortal fast against the sale of wine )

अण्णा हजारे यांचे राज्यभरातील कार्यकर्ते या निर्णयाच्या विरोधात एकाच वेळी तीव्र जनआंदोलन उभारणार आहेत. तशा आशयाचे पत्र हजारे यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना तीन फेब्रुवारीस पाठविले असून आजही पुन्हा हजारे यांनी मुख्य़मंत्री उद्धव ठाकरे यांना स्मरण पत्र पाठविले.

Anna Hazare News Updates
अण्णा हजारे यांनी अमित शहांना पत्र काय लिहिले आणि दोन मित्रांतच वाद पेटला...

हजारे यांनी पाठविलेल्या पत्रात पुढे म्हटले आहे की, मी मुख्यमंत्री ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र पाठविले मात्र त्याला उत्तर आले नाही. त्या मुळे मी राज्य सरकारने सुपर मार्केट आणि किराणा दुकानात वाईन विक्रीला ठेवण्याचा निर्णय घेतल्याच्या निषेधार्थ प्राणांतिक उपोषण करणार आहे.

युवाशक्ती ही राष्ट्रशक्ती आहे. तीच राज्य आणि राष्ट्र घडवू शकेल. तरूण पिढी ही खरी देशाची संपत्ती आहे. त्यातूनच उद्याचे महापुरूष तयार होणार आहेत. मात्र सरकारच्या सुपरमार्केट वाईन विक्रीच्या निर्णयामुळे युवाशक्तीवर काय परिणाम होईल याचा सरकारने विचार केलेला नाही.

Anna Hazare News Updates
Video : किराणा दुकानात वाईन विक्रीला अण्णा हजारेंचा विरोध

वाईन विक्रीच्या निर्णयामुळे युवकांवर समाजावर काय परिणाम होईल याचा सरकारने विचार केलेला नाही. फक्त मिळणाऱ्या महसुलाचा विचार केलेला दिसतो. ज्या सत्तेमध्ये समाज, राज्य, राष्ट्र हिताचा विचार नसेल अशी सत्ता काय कामाची? ज्यांनी राज्य चालवायचे आहे त्यांनी जनतेचा सल्ला न घेता आपल्या मनाला वाटेल असे निर्णय घेणे म्हणजे लोकशाही नव्हे असेही हजारे यांनी पत्रात म्हटले आहे.

वाईन समाजाला घातक आहे. हे छोटा मुलगा सुद्धा सांगू शकेल. परंतू राज्य चालविणाऱ्यांना कळू नये हे दुर्दैवी आहे. आमच्या गावात 50 वर्षांपूर्वी 35 दारूभट्ट्या होत्या. गेली 22 वर्षांत गावात विडी, सिगारेट, तंबाखू, गुटखा सुद्धा मिळत नाही. राज्य सरकार मात्र सुपरमार्केट आणि किराणा दुकानात वाईन ठेवण्याचा निर्णय घेते हे मोठे दुर्दैव आहे.

Anna Hazare News Updates
पवारसाहेब आम्ही पीत नाही; तुम्हीच वाईन, दारूतील फरक सांगा...

सरकारने सुपरमार्केट आणि किराणा दुकानामध्ये वाईन विक्रीला ठेवण्यासाठी परवाना देण्याचा घेतलेला निर्णय राज्यासाठी अत्यंत दुर्दैवी आहे. तो भावी पिढ्यांसाठी घातक असल्याने मी या सरकारचा निषेध करण्यासाठी प्राणांतिक उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र कार्यकर्त्यांनी माझ्या प्रमाणे उपोषण करू नये.

Anna Hazare News Updates
वाईन विक्रीचा निर्णय सरकार मागे घेणार? शरद पवारांनी दिले संकेत

राज्यातील अनेक संस्था व संघटनांनी वाईनच्या निर्णया विरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच पक्षविरहित समाज, राज्य आणि राष्ट्र हिताचा विचार करून अहिंसेच्या मार्गाने आंदोलन करण्यासाठी व आंदोलनाची दिशा ठविण्यासाठी राज्यात विभागवार बैठक आयोजित करणार आहे.

- अण्णा हजारे, ज्येष्ठ समाजसेवक.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com