Solapur News : येत्या काळात जर देशात लोकशाही टिकवायची आहे की, हुकूमशाही याचा विचार करण्याची वेळ आली आहे. प्रणिती सारख्या विद्वान लोकप्रतिनिधीला संसदेत पाठवून पुन्हा एकदा सोलापूरचे नाव दिल्लीत गाजवू द्या, असे आवाहन करत काँग्रेस नेते आणि माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापूर मतदारसंघातील उमेदवाराची घोषणा केली.
सोलापुरात आयोजित करण्यात आलेल्या एका सभेत ते बोलत होते. आम्ही केलेल्या रस्ते, एनटीपीस, पॉवर ग्रीडचे काम आम्ही केले. मात्र मोदीनी त्याचे उदघाट्न केले. आम्ही सुरु केलेल्या कामाकडे सत्ताधाऱ्यांनी लक्ष दिले नाही, अशी टीका त्यांनी केली आहे.
एकदा राज्य सभा, दोनदा लोकसभेवर मला सभागृहात पाठवले आहे. मी एससी कॅटगिरीचा असताना मला ओपनच्या जागेवरून निवडून दिले. मात्र जागा राखीव झाल्यावर मला पाडले, असे कसे झाले माहिती नाही, असेही यावेळी सुशीलकुमार शिंदे म्हणाले.
अटल बिहारी हे सज्जन पंतप्रधान होते, त्यांना देखील बाजूला सरण्याचे काम केले गेले. राम मंदिरमध्ये अडवाणी आणि यांनी राम मंदिर बनवण्यासाठी रथयात्रा काढली होती. भाजपा सत्तेत आली आणि जिथे तिथे आश्वासन देत सुटली. जी काम आम्ही केली त्याचं कामाचे उदघाटन हे करत सुटले, असंही सुशीलकुमार शिंदे यांनी नमूद केले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
यावेळी बोलताना प्रणिती शिंदे (Praniti Shinde) म्हणाल्या, मी जी टीका केली त्यामध्ये मी कोणाचेही नाव घेतले नाही. त्यामुळे वंचितने ती पोस्ट काढावी. कारण मी फक्त म्हणाले की, जे कोणी काँग्रेस (Congress), मविआ किंवा इंडिया आघाडीचे वोट डिवाईड करतं ते भाजपला मदत करते एवढंच मी म्हणाले. वंचितने असे का केले हे मला माहिती नाही. मी यापूर्वीही सांगितले की काँग्रेस माझ्या रक्तात आहे. याबाबत स्पष्टीकरण दिले आहे लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत काँग्रेसचे काम करत राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.