Nagar Bazar Samiti Result : नगरमध्ये विखे, कर्डिलेंची जादू ; लंकेंचा डंका, तनपुरेंचे वर्चस्व अबाधित, निवडणुकीची ही आहेत वैशिष्ठ्ये..

Nagar APMC Election 2023 : शिवाजी कर्डिले यांच्या शेतकरी विकास मंडळाने निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले.
Nilesh lanke , Rohit Pawar
Nilesh lanke , Rohit PawarSarkarnama

APMC Election 2023 Ahmednagar news : राज्यभरात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (APMC Election 2023) निवडणुकीचे निकाल हाती येत आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील १४ पैकी सात बाजार समित्यांचे निकाल काल (शनिवारी) जाहीर झाले.

माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांचे नगर तालुक्यात निर्विवाद वर्चस्व राहिले, तर राहुरीत त्यांना धक्का बसला. आमदार नीलेश लंकेंचा डंका पुन्हा वाजला असून त्यांनी सर्व जागा पटकावल्या.

राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) व कॉंग्रेसच्या महाविकास आघाडीला चार, तर भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) युतीला दोन बाजार समित्यांवर वर्चस्व सिद्ध करता आले. कर्जतमध्ये मात्र आमदार रोहित पवार व आमदार राम शिंदे यांच्या पारड्यात मतदारांनी समसमान जागा टाकल्या.

मोनिका राजळेंकडून ढाकणेंना धक्का

भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांच्या नेतृत्वाखाली पाथर्डी कृषी बाजार समितीत आदिनाथ शेतकरी मंडळाने १७ जागा मिळविल्या आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ॲड. प्रताप ढाकणे व माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्या नेतृत्वाखालील जगदंबा विकास मंडळाला केवळ १ जागेवर समाधान मानावे लागले. या बाजार समितीवर ॲड.ढाकणे यांची सत्ता होती.

Nilesh lanke , Rohit Pawar
Bazar Samiti Election: दूध संघानंतर बाजार समितीतही भाजप आमदार चव्हाणांचे वर्चस्व ; चाळीसगावात सत्ता खेचून आणली..

रोहित पवार-राम शिंदेंना समान जागा

कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीत आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखालील सहकार व शेतकरी विकास आघाडीला ९ जागा मिळाल्या. आमदार राम शिंदे यांच्या नेतृत्वाखालील भाजप व शिवसेनेच्या स्वाभिमानी शेतकरी विकास मंडळाला ९ जागा मिळाल्या. दोन्ही मंडळाला समसमान जागा मिळाल्याने दोन्ही नेत्यांचे एकमेकांसमोर मोठे आव्हान उभे राहणार आहे.

विखे पाटील व शिवाजी कर्डिले यांची जादू

भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील व माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांची जादू नगर तालुका व पाथर्डीत चांगली चालली. भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांनी राष्ट्रवादीच्या हातून सत्ता हिसकावून घेतली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार नीलेश लंके व शिवसेनेचे माजी आमदार विजय औटी यांनी केलेली युती पारनेरकरांना आवडली. त्यामुळे भाजपचा धुव्वा उडाला.

Nilesh lanke , Rohit Pawar
Nitesh Rane Statement : उद्धव ठाकरे आजारी असताना आदित्य यांनी मुख्यमंत्री होण्याचा कट रचला..; राणेंचा गौप्यस्फोट

तनपुरेंचे वर्चस्व अबाधित

राहुरीमध्ये भाजपच्या दिग्गजांना तोंड देत आमदार प्राजक्त तनपुरे यांनी आपले वर्चस्व अबाधित ठेवले. संगमनेरमध्ये अपेक्षेप्रमाणे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार बाळासाहेब थोरात यांच्या गडाला कोणीही धक्का लावू शकले नाही. राहुरी तालुका बाजार समितीत माजी मंत्री व राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीला १६ जागा मिळाल्या. तर उर्वरित २ जागा भाजपप्रणित विकास मंडळाला मिळाल्या. त्यामुळे तनपुरेंचे वर्चस्व तालुक्यात अबाधित राहिल्याचे स्पष्ट झाले आहे.

महाविकास आघाडीला भोपळा

नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीत माजी मंत्री तथा जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांच्या शेतकरी विकास मंडळाने निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. सर्व १८ जागा जिंकून विजय मिळविला. विरोधी शिवसेनेचे (ठाकरे गट) जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीला एकही जागा मिळविता आली नाही.

Nilesh lanke , Rohit Pawar
Palghar APMC Election: पालघरमध्ये आघाडीनं झेंडा रोवला ; शिंदे गटाचा सुपडा साफ

भाजपच्या जनसेवा मंडळाचा धुव्वा

पारनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीवर आमदार लंके व माजी आमदार औटी यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने सर्व १८ जागा जिंकून विरोधी भाजपच्या जनसेवा मंडळाचा धुव्वा उडविला.संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत आमदार थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी विकास मंडळाने एकहाती सत्ता मिळविली. १८ पैकी १७ जागांवर वर्चस्व मिळविले. इतर एक अपक्ष निवडून आला असला, तरी त्याने लगेचच थोरात गटाला पाठिंबा दिला.

श्रीगोंदे येथे राष्ट्रवादीचा वरचष्मा

श्रीगोंदे बाजार समितीत राष्ट्रवादीचे माजी आमदार राहुल जगताप यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीला ११ जागा मिळाल्या. भाजपचे आमदार बबनराव पाचपुते व कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे यांच्या युतीला ७ जागा मिळाल्या. राष्ट्रवादी कॉंग्रेसचा या बाजार समितीत वरचष्मा राहिला. त्यामुळे भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे.

  • खासदार डॉ. सुजय विखे पाटील गटाला पारनेर, संगमनेरमध्ये खातेही उघडता आले नाही

  • श्रीगोंद्यात भाजप व कॉंग्रेसची युती रुजली नाही. माजी आमदार राहुल जगतापांची बाजी

  • आमदार प्राजक्त तनपुरे यांचा गड अबाधित

  • आमदार मोनिका राजळेंनी सत्ता खेचून आणली

  • माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांचे नगर तालुक्यात निर्विवाद वर्चस्व राहिले. राहुरीत मात्र धक्का

  • आमदार रोहित पवार व आमदार राम शिंदे यांना समसमान जागा मिळाल्या

  • आमदार बाळासाहेब थोरात यांचे संगमनेरमध्ये पुन्हा वर्चस्व सिद्ध

  • आमदार नीलेश लंकेंचा डंका पुन्हा वाजला. सर्व जागा मिळविल्या

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com