आशुतोष काळे म्हणाले, शरद पवार पंतप्रधान व्हावेत...

कोपरगाव येथे ज्येष्ठ नेते शरद पवार ( Sharad Pawar ) यांच्या 81 व्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ( NCP ) कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
Ashutosh Kale
Ashutosh KaleSarkarnama
Published on
Updated on

कोपरगाव ( अहमदनगर ) : कोपरगाव येथे ज्येष्ठ नेते शरद पवार ( Sharad Pawar ) यांच्या 81 व्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ( NCP ) कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यात साईसंस्थानचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे ( Ashutosh Kale ) यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. Ashutosh Kale said, Sharad Pawar should be the Prime Minister ...

या मेळाव्याला पक्षाच्या माहिती तंत्रज्ञान सेलचे प्रदेशाध्यक्ष जितेन सरडे, वक्ता प्रशिक्षण विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. तुषार वाघमारे, पक्षाचे तालुकाध्यक्ष माधव खिलारी, कारभारी आगवण, पद्मकांत कुदळे, शहराध्यक्ष सुनील गंगुले, रमेश गवळी, कृष्णा आढाव, नवाज कुरेशी, प्रतिभा शिलेदार, रेखा जगताप, वैशाली आभाळे, काळे कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, पंचायत समितीचे उपसभापती अर्जुनराव काळे आदी उपस्थित होते.

Ashutosh Kale
आमदार आशुतोष काळे, आमदार जाधव यांना साईबाबा पावले!

आमदार आशुतोष काळे म्हणाले, देशात शेतकऱ्यांपासून ते उद्योजकांपर्यंत आणि कामगारांपासून ते शेतमजुरांपर्यंत विविध घटक अडचणीत सापडले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चुकीच्या धोरणांचा हा परिपाक आहे. या अडचणींतून देशाला प्रगतीकडे नेण्याची कुवत फक्त ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या नेतृत्वात आहे. ते पंतप्रधान व्हावेत, अशी आपणा सर्वांची इच्छा आहे, असे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले.

आमदार काळे पुढे म्हणाले की, प्रत्येक आपत्तीतून देशाला सावरण्यासाठी पवार यांचे मार्गदर्शन उपयोगी पडते. केंद्रात कुठल्याही पक्षाचे सरकार असले, तरी त्यांचा सल्ला व मार्गदर्शन घेतले जाते. हे त्यांच्या नेतृत्वाचे मोठेपण आहे. केंद्रात काही निर्णय चुकीचे झाल्याने अर्थव्यवस्थेची गती मंदावली. देशाची विस्कटलेली घडी ते पुन्हा बसवू शकतात. पक्षाचे विचार घराघरांत पोचविण्याचे व आगामी निवडणुकांत पक्षाला विजय मिळवून देऊन त्यांना वाढदिवसाची भेट देण्यासाठी कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन काळे यांनी केले.

Ashutosh Kale
शिर्डी देवस्थान पहिल्यांदाच राष्ट्रवादीकडे : आमदार आशुतोष काळेंकडे अध्यक्षपद

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचा येत्या 12 डिसेंबर रोजी वाढदिवस आहे. तालुक्यातील महिला बचतगटांना 39 लाख 55 हजार रुपयांचे कर्जवितरण करून या वाढदिवसाच्या पूर्वतयारीला आम्ही प्रारंभ केला आहे. ते पंतप्रधान व्हावेत, अशी प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा आहे.

- आमदार आशुतोष काळे, अध्यक्ष, साईसंस्थान

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com