आशुतोष काळे म्हणाले, नगरपालिकेत सत्ता मिळविण्यासाठी कामाला लागा

आमदार आशुतोष काळे ( MLA Ashutosh Kale ) यांनी कोपरगावमधील ( Kopargaon ) कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्यास सांगितले. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP ) कार्यकर्ते निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत.
Ashutosh Kale
Ashutosh KaleSarkarnama
Published on
Updated on

कोपरगाव : कोपरगाव नगरपालिकेतील नगरसेवकांची मुदत दोन महिन्यांत संपत आहे. त्यामुळे तेथे सार्वत्रिक निवडणूक जाहीर होणार आहे. त्यादृष्टीने आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगावमधील कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्यास सांगितले. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. Ashutosh Kale said, start working to get power in the municipality

कोपरगाव शहरातील साईनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शाखेचे उद्‍घाटन आमदार काळे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी आमदार काळे म्हणाले, विधानसभा निवडणुकीत मतदारांनी ऐतिहासिक बदल घडवला. दोनच वर्षांत प्रतिकूल परिस्थितीतही मतदारसंघाच्या विकासकामांना चालना दिली. त्यामुळे असाच बदल कोपरगाव नगरपालिकेच्या निवडणुकीत देखील करून, शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सत्ता मिळविण्यासाठी कामाला लागा, अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी कार्यकर्त्यांना दिल्या.

Ashutosh Kale
आमदार आशुतोष काळे यांनी दिले कोपरगावकरांसाठी हे आश्वासन

ते पुढे म्हणाले, की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहरविकासाचे व्हीजन प्रत्येक कार्यकर्त्याने घराघरांत पोचवावे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेहमी विकासाच्या बाजूने असल्यामुळे नागरिकांचा आपल्यावरील विश्वास अधिकच वाढला आहे. त्यामुळे नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सत्ता मिळवून द्यायचीच, हा एकच उद्देश डोळ्यांसमोर ठेवून कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. यश निश्चित मिळेल.

यावेळी आकाश आंग्रे, आकाश जगताप, प्रदीप थोरात, निरंजन कुडेकर, मुनेश गुप्ता, कृष्णा कडलग आदी कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा, शहराध्यक्ष सुनील गंगुले, नगरसेवक मंदार पहाडे, संदीप पगारे, अजीज शेख, मेहमूद सय्यद, राजेंद्र वाकचौरे, युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी, राहुल रोहमारे, साईनगर शाखेचे अध्यक्ष अभिषेक कोकाटे, अध्यक्ष विवेक वाघ, उपाध्यक्ष श्रेयश आढाव, सचिव आदेश काले, संघटक सत्यम जगदाळे, खजिनदार अथर्व वढणे आदी उपस्थित होते.

Ashutosh Kale
पवार-विखे वादाला तरूणाई मैत्रीत बदलू पाहतेय...

आश्वासनांची पूर्ती केली

सत्ता नसताना शहरातील प्रश्न सोडविण्यासाठी संघर्ष केला. सत्ता आल्यानंतर प्रश्न मार्गी लावले. निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांप्रमाणे क्रमांक पाच साठवण तलावाचा प्रश्न निवडून येताच दोनच महिन्यांत मार्गी लावला. इतरही विकासाचे प्रश्न सोडविण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी आणला आहे, असेही यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com