भाजपसोबत सत्ता स्थापनेसाठी आठवलेंची शिवसेनेला पुन्हा साद

शिवसेनेने (Shivsena) अजूनही निर्णय बदलावा
Ramdas Athawale
Ramdas Athawale

सांगली : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार (Mahavikas Aghadi) स्थापन होऊन दोन वर्षे झाली. शिवसेनेने (Shivsena) भाजपसोबतची (BJP) पंचवीस वर्षांची युती तोडून राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP) आणि कॉंग्रेससोबत (Congress) सत्ता स्थापन केली. या दोन वर्षात अनेकदा सरकार पडेल अशा चर्चाही सुरु होत्या. शिवसेनेने राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेससोबत सत्तास्थापन केल्यानंतर अनेकदा विरोधी पक्षातील नेत्यांनी शिवसेनेला पुन्हा भाजपसोबत येण्याचे आवाहन केले आहे.

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athavale) यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेनेला भाजपसोबत सत्ता स्थापन्याचे आवाहन केले होते. त्यानंतर आज पुन्हा त्यांनी शिवसेनेला भाजपसोबत येण्यासाठी साद घातली आहे. " शिवसेनेने अजूनही निर्णय बदलावा. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार करायचं असेल तर शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आली पाहिजे. भाजप, शिवसेना आणि आरपीआय एकत्र असले पाहिजेत, असे म्हणत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भाजपसोबत सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेला पुन्हा एकदा साद घातली आहे.

Ramdas Athawale
अनेकांनी माझ्या वडीलांना धर्म बदलण्याचा सल्ला दिला होता...

अडीच वर्षाचा मुख्यमंत्री पदाचा जो फॉर्म्युलानरही त्यांनी भाष्य केलं आहे. ''अडीच वर्षाचा मुख्यमंत्री पदाचा जो फॉर्मूला होता त्यावर पुन्हा एकदा भाजप-शिवसेनेचे एकमत व्हायला काही हरकत नाही. अडीच वर्षानंतर मुख्यमंत्रीपद देवेंद्र फडणवीस यांना द्यावे आणि उपमुख्यमंत्रीपद शिवसेनेला द्यावं,'' असही रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

महाविकास आघाडी सरकारमध्ये अनेक विषयांवर वादविवाद आहेत, भ्रष्टाचारासंबंधीच्या अनेक चौकशा सुरू आहेत. त्यामुळे अशा पद्धतीचे सरकार महाराष्ट्रामध्ये राहणे योग्य नाही. असंही आठवले यांनी म्हटलं आहे. तसेच, केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणतात, सरकार पडेल त्याप्रमाणे आम्ही देखील सरकार पडण्याची वाट पाहत असल्याचे रामदास आठवले यांनी म्हटल आहे.

महाविकास आघाडी सरकार आल्यापासून एसटी कामगारांवरवर अन्याय होतोय. एसटी महामंडळाचा राज्य शासनामध्ये विलीनीकरण करावे, यासाठी जी समिती नेमली आहे, त्याचा अहवाल कदाचित विलीनीकरणासंबंधी येण्याची  शक्यता आहे, असेही रामदास आठवले यांनी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com