कांद्याला एक रुपया भाव मिळाल्याने शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

खिर्डी (ता. श्रीरामपूर) येथील शेतकरी भारत गंगाराम जाधव (वय 35) या हतबल झालेल्या तरुण शेतकऱ्यांने आत्महत्येचा प्रयत्न केला.
Farmer Bharat Jadhav
Farmer Bharat JadhavSarkarnama
Published on
Updated on

बापूसाहेब कोकणे

टाकळीभान ( जि. अहमदनगर ) - कांद्याचे दर उतरले आहेत. श्रीरामपूर उपबाजार समितीत विक्रीसाठी आणलेल्या कांद्याला अवघा एक रुपया प्रति किलो असा दर मिळाल्याने खिर्डी (ता. श्रीरामपूर) येथील शेतकरी भारत गंगाराम जाधव (वय 35) या हतबल झालेल्या तरुण शेतकऱ्यांने आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना (ता. 15) रविवार रोजी घडली. ( Attempt by a farmer to get onion at a price of one rupee )

जाधव यांनी टाकळीभान उपबाजार समितीत 40 गोण्या कांदे विक्रीसाठी आणले होते मात्र कांदा लिलाव सुरू होताच व्यापाऱ्यांनी कांदा गोणी फोडल्यावर त्यांच्या कांद्याला एक रुपया प्रति किलो असा कवडीमोल दर काढला व बोली पुढे न गेल्याने ते हतबल झाले त्यांनी बाजार समितीच्या आवारात विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांना समितीच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने श्रीरामपूर येथील साखर कामगार रुग्णालयात उपचारासाठी पाठविले. आज चौकशी केली असता त्यांची प्रकृती सुधारत आहे.

Farmer Bharat Jadhav
#Farmers Protest : तोडगा निघणार का तिढा कायम राहणार..आज बैठक

एकीकडे उसाला तोड येत नाही ती आलीच तर एकरी 10 ते 15 हजार रुपये ऊस तोडणी मजुरांना किंवा मशीनवाले यांना अगोदर द्यावे लागतात तर दुसरीकडे कांदा नो बीट होतो किंवा एक रुपया प्रति किलो दराने देण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत असेल तर आत्महत्येशिवाय पर्याय नाही आणि याच विवंचनेतून माझ्या भावाने विषारी औषध प्राशन केले असावे .

- भाऊसाहेब जाधव, शेतकरी

40 गोणी मार्केटपर्यंत आणण्यासाठी मला 3300 रुपये खर्च आला व मला 1200 रुपये कांदा पट्टी मिळत होती भावाबाबत मी आडत व्यापाऱ्याला विचारले असता मला त्याच्याकडून शिवराळ भाषेत वागणूक मिळाली मला या गोष्टीचा खूप त्रास झाल्यामुळे महाराष्ट्रातील इतर शेतकऱ्यांना तो त्रास होऊ नये म्हणून त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे.

- भारत जाधव, पीडित शेतकरी.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com